गीतेच्या गाभाऱ्यात

    17-Jun-2023
Total Views |
 
 
पत्र विसावे

Bhagvatgita 
असे जरी असले तरी माझे शिक्षण कमी आहे, हा विचार मात्र माझ्या मनातून जात नाही’’ तुझे पत्र हृदयाला जाऊन भिडणारे आहे. तूं जरा सखाेल विचार कर.अग! शिक्षण याचा अर्थ काय? विद्यालयाच्या पदव्या म्हणजे शिक्षण अशी तुझी समजूत चुकीची आहे.इमर्सनने म्हटले आहे - शाळा काॅलेजात जे शिकवले जाते ते शिक्षण नसून ते शिक्षणाचे साधन आहे.(The things taught in schools and colleges are not education but the means of education.)अग! रामदास काेणत्या महाविद्यालयात शिकायला गेले हाेते? ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांना काेणत्या शैक्षणिक पदव्या मिळाल्या हाेत्या? छत्रपती शिवाजी महाराज काेणत्या काॅलेजात शिकायला गेले हाेते? शाळा काॅलेजात जाऊन शिकणे व पदव्या मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे. जीवन कसे चांगले जगावे, याचे ज्ञान म्हणजे शिक्षण व या ज्ञानाप्रमाणे आचरण म्हणजे प्रशिक्षण.
 
या ज्ञानाचा तू विचार कर.गीतेच्या अभ्यासात तू रंगून गेली आहेस. जीवन चांगले जगण्याकरता गीतेसारखा उत्कृष्ट असा गं्रथ नाही. जीवन कसे चांगले जगावे याचे तुला खूप ज्ञान प्राप्त आहे. या ज्ञानाप्रमाणे तू आचरण करण्याचा मनापासून प्रयत्न करत आहेस.
याचाच अर्थ असा की - तुला खूप शिक्षण व प्रशिक्षण प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत आपले शिक्षण कमी आहे हा विचार तू मनातून काढून टाक.तुला जे शिक्षण व प्रशिक्षण प्राप्त झाले आहे, तसले शिक्षण व प्रशिक्षण नसताना शिक्षणाची भाषा बाेलणे म्हणजे रामाशिवाय रामायण सांगण्याप्रमाणे आहे.असाे! बाकीचा मजकूर पुढील पत्रात तुझा राम *** पत्र एकविसावे प्रिय जानकी, तुझे पत्र पावले. काशीरामेश्वर यात्रा करून आल्यापासून तुझ्या मनात शिवाबद्दल पराकाष्ठेचे औत्सु्नय निर्माण झाले आहे व त्या औत्सु्नयाचे प्रतिबिंब म्हणजे तुझ्या पत्रात पडलेले शिवविषयक प्रश्नांचे चांदणे.
 
तू विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे थाेड्नयात अशी आहेत - रामायणातील राम-रावण हे दाेघेही कट्टर शिवभ्नत हाेते हे तुला माहित आहे.
भगवान कृष्ण देखील शिवभ्नत हाेते.महाभारताच्या अनुशासन पर्वात कृष्णाने शिवाची उपासना केल्याचे वर्णन आहे.शिवाची स्तुति करताना कृष्णाने म्हटले आहे - ‘‘हे महादेवा सर्वांच्या हृदयात तुझी वसती आहे. साऱ्या याेगसिद्धी तूच आहेस. जे नित्य याेगसाधने करतात ते तुझ्याच प्राप्तीसाठी झटतात. तू बुद्धिमान लाेकांचे अंतिम साध्य आहेस....’’ महाभारतात नरनारायणाची जाेडी आहे. त्यांचा महान संवाद म्हणजे गीता. नारायण म्हणजे कृष्ण व नर म्हणजे अर्जुन.महाभारतात द्राेणपर्वात व्यास अश्वत्थाम्याला सांगतात की -