ओशाे - गीता-दर्शन

    16-Jun-2023
Total Views |
 
 

Osho 
 
वस्तूंशीही माणसांचा राेमान्स चालताे. आपण जेव्हा एखादी कार खरीदण्याचा विचार करता.तेव्हा ते फारसं वेगळं नसतं. एखाद्यानं नव्या स्त्रीच्या प्रेमात पडावं आणि रात्री त्यानं स्वप्न पाहावीत त्याच प्रकारे कार स्वप्नात येऊ लागते. तशीच ती अवस्था असते जवळजवळ. वस्तूंचं सुद्धा इनफॅच्युएशन असतं. खूळ असतं. वस्तूंशीही प्रेमप्रकरण चालू हाेतं. अपरिग्रही चित्ताला वस्तूत रस नसताे. ते त्यांचा फ्नत उपयाेग करतं. लक्षात राहू द्या.वस्तूतला रस ज्याचा जितका जास्त तितकाच ताे तिचा उपयाेग कमी करू शकताे. वस्तूत जितका रस कमी तितका त्या वस्तूचा उपयाेग पूर्णपणे जास्त करू शकताे. कारण उपयाेगासाठी एका डिटॅचमेंटची, एका अनास्नत अंतराची गरज असते.
 
एक सज्जन माझ्या ओळखीचे आहेत. गेली दहा वर्षे त्यांच्या व्हरांड्यात एक स्कूटर मी पाहात आहे. सुरुवातीला दाेनतीनदा मी त्यांना विचारलं ‘स्कूटर बिघडली आहे काय?’ त्यांनी म्हटलं, ‘ नाही हाे, स्कूटर बिघडलेली नाही.’ मग मी गप्प राहिलाे. व्हरांड्यातील ती स्कूटर ते कितीतरी तेळा चालू करायचे, पुन्हा बंद करून आत निघून जायचे. मी विचारलं - ‘काय, भानगड काय? स्कूटर बाहेर का काढीत नाही?’ त्यांना भारी महत्व आहे तिचं. स्कूटर कसली, प्रेयसीच ती त्यांची. ती ते अशी हळुवारपणे पुसून वगैरे ठेवतात.पण बाहेर मात्र काढीत नाहीत ते. बाहेर पडतात ते अजूनही जुनाट सायकलीवरच. जेव्हा बाहेर पडायचं ते तिच्यावरच. मी बरेच वेळा हे पाहिलं मी म्हटलं-ही स्कूटर कशासाठी आहे?