ओशाे - गीता-दर्शन

    15-Jun-2023
Total Views |
 
 

osho 
 
मुलांच्या आवडीची लाच असते- चाॅकलेट, टाॅफी. वडील घरी परतताना तर विचार करतात. ‘आज काय लाच घरी घेऊन जावी बरं.’ दारात उभा असणारच हा टीचभर मुलगा, ज्याला जीवनातली काेणतीच ताकद अजून आलेली नाही, काही नाही, त्यालासुद्धा घरी परतताना वडील घाबरतात. आई-बापांवर आपल्या छाेट्या-छाेट्या मुलांना सुद्धा खाेटं सांगायची पाळी येते. सिनेमाला जायचं असेल तर गीता-ज्ञान सत्राला चाललाेत, असं ते सांगतात.व्य्नतीशी संबंध ही फार गुंताड्याची गाेष्ट आहे. छाेटीशी जिवंत व्य्नती, अन् गुंताडा चालू हाेताे. मग आपण व्य्नतींना बाजूला सारायला लागताे की, ‘माणसं हटवा, वस्तू वाढवा.’ घरात जा, कुठंही नजर टाका.
 
आपणच मालक असता. खुर्च्या, टेबले, फर्निचर, कार, फ्रीज, रेडिओ सगळ्या वस्तू आपापल्या ठिकाणी असतात. आपण मालक असता, मग वस्तूंशी संबंध वाढतात. व्य्नतींशी संबंध क्षीण हाेत जातात. संस्कृती जसजशी विकसित हाेते तसतसे वस्तूंशी संबंध राहतात. अन् माणसा- माणसामधले संबंध हरपून जातात. म्हणून अपरिग्रह या दुसऱ्या सूत्रावर जाणूनबुजून पुन्हा सांगायचं ठरवलं, ते सुटून गेलं हाेतं म्हणून.ज्या चित्ताला वस्तूंच्या मालकीत अजिबात रस नसताे, ते अपरिग्रही चित्त म्हणायचं.उपयु्नतता ही वेगळी गाेष्ट आहे अन् रस निराळा आहे. त्याला वस्तूंमध्ये काहीही रस नसताे. वस्तूंशी ताे कसलाही गुलामीचा संबंधनिर्माण करीत नसताे.