धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयाेग

    15-Jun-2023
Total Views |
 
 

Gondavlakar 
 
द्वैत आणि अद्वैत ही काय भानगड आहे? भगवंतापासूनच सर्व झाले.एकापासून दाेन झाले. आपण मूळ स्वरूपापासून बाजूला झालाे म्हणून द्वैत आले. मायेमध्ये सापडले नाही म्हणजे अद्वैतात राहता येईल. माया कल्पनेचीच झाली; तिला कल्पनेनेच मारावी. एकच करावे : अद्वैतात जे राहिले त्यांच्या नादी आपण राहावे. भगवंताचे हाेण्याकरिता, ज्याने मी वेगळा झालाे ते साेडावे. ज्याच्यापासून माया निर्माण झाली त्यालाच शरण जावे. माया तरी भगवंतामुळेच झाली.जाे भगवंताचा हाेताे त्याला माया नाही बाधत.मायेचा जाेर संकल्प-विकल्पात आहे. अखंड स्मरणात राहावे म्हणजे नाही माया बाधत. भगवंताचे नाम हे स्थिर आहे, पण रूप मात्र सारखे बदलते. प्रत्यक्ष साकाररूप हेच काही रूप नव्हे; जे जे आपल्या कल्पनेमध्ये येऊ शकेल ते ते सर्व रूपच हाेय.
 
भगवंताच्या नामात माेबदल्याची अपेक्षा नाही, म्हणून ते पूर्ण आहे. समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव हाेय. म्हणूनच, जे पूर्ण नाही ते असमाधान. भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान हाेय, आणि हेच पूर्णपण आहे. जे शास्त्र समाधान देते तेच शास्त्र खरे हाेय; आणि ज्याने शांति आणि समाधानाचा लाभ हाेताे ताेच खरा धर्म हाेय. धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयाेगच. जाे दुसऱ्याच्या हिताकडे न पाहता आपल्या हिताकडेच पाहताे ताे स्वार्थीच हाेय. सुख व्हावे ही मनुष्याला इच्छा असल्यामुळे अस्वस्थपणा येताे.या अस्वस्थतेमधून तळमळ निर्माण हाेते. या तळमळीमुळे जगाच्या सर्व सुधारणा बाहेर पडतात. पण ह्या सुधारणा जितक्या जास्त हाेतात तितके मनुष्याला दु:ख जास्तच हाेते.जी विद्या केवळ नाेकरीचे साधन आहे ती अपूर्णच असते.
 
असली विद्या पाेटापुरतीच समजावी, ती समाधान देऊ शकणार नाही. समाधान देणारी विद्या निराळीच आहे. म्हणून लाैकिक विद्येला ार महत्त्व देऊ नये. बाहेर हिंडण्यासाठी जाेडा अत्यंत आवश्यक आहे खरा, पण ताे पायांमध्ये घालून देवघरात जाऊ नये. एखादे वेळी आपल्याला असा संशय येताे की, जगात कुठे सुखसमाधान आणि आनंद आहे का? पण ताे संशय बराेबर नाही. कारण ज्या गाेष्टी जगात नाहीत त्यांचे नावच कसे निघेल? असमाधान याचा अर्थच ‘समाधान नाही ते.’ यावरून असे स्पष्ट दिसते की, आधी समाधान असलेच पाहिजे. दिवाळीमध्ये, सुखाचे जे असेल ते आज करताे आणि दु:खाचे जे असेल ते आपण उद्यावर टाकताे. ह्याचा अर्थ असा की, आपली काळजी नाहीशी झालेली नसूनही आपण आजचा दिवस चांगला म्हणजे काळजीविरहित घालविताे. उद्या पुन्हा काळजी आहेच; पण जाे भगवंताचे स्मरण ठेवील त्याला काळजी नसते. ज्याची प्रत्येक कृती रामाच्या स्मरणामध्येच हाेते, ताेच रामराज्यात खरा राहताे हे निश्चित समजा.