गीतेच्या गाभाऱ्यात

    15-Jun-2023
Total Views |
 
 
पत्र विसावे
 
Bhagvatgita
‘‘आमची काहीतरी चूक झाली. तुम्हाला आम्ही पिल्लू विकले पण चुकीने विकले. हे पस्तीस रुपये घ्या व पिल्लू परत द्या.’’ त्या श्रीमंत गृहस्थाने पस्तीस रुपये घेऊन पिल्लू परत दिले.ते चाेर त्या पिल्लाला घेऊन आले. त्यांनी ते मालकाला परत दिले.मालक बरेच पैसे देण्यास तयार हाेता. पण त्या चाेरांनी पूर्वी बाेलल्याप्रमाणे फ्नत पस्तीस रुपये घेतले.या गाेष्टीचे तात्पर्य काय आहे ते तू नीट बारकाईने विचार करून ठरव.स्वतःचे पिल्लू नसताना त्या चाेरांनी पस्तीस रुपये मिळवले.पिल्लाच्या मालकाला वाटले - यांनी आपल्यावर उपकार केले आहेत. यांनी खराेखर जास्ती रुपये मागणेस पाहिजे हाेते.ज्या गृहस्थाकडून पस्तीस रुपये घेऊन त्या चाेरांनी त्याला पिल्लू दिले हाेते त्या गृहस्थाला चाेरांनी पस्तीस रुपये दिले व पिल्लू परत घेतले.
 
त्या श्रीमंत गृहस्थाला वाटले - यांनी आपल्याला बिलकुल फसवले नाही.गीता वाचल्यामुळे चाेरांच्या मनावर काय परिणाम झाला व ते कसे वागले ते या मार्मिक गाेष्टीवरून तुला कळून येईल.तू ध्यानाच्या बाबतीत माेठा मार्मिक प्रश्न विचारला आहेस. त्याचे उत्तर असे की - ध्यानामध्ये आपणाला खूप माेठा प्रकाश दिसताे. सूर्य आपल्या अगदी जवळ येताे, पण त्याचा प्रकाश थंड असताे. कितीतरी दिव्य नाद ऐकू येतात. उत्कृष्ट सुगंध येताे. केव्हा केव्हा देवाचे जगड्व्याळ भयंकर रूप दिसते, पण - तुला एक गुह्य सांगू? या सर्वांपेक्षा ध्यानामध्ये जेव्हा कृष्णाची सुंदर, सुकुमार, नयनमनाेहर मूर्ति येते व ती आपल्याशी बाेलू लागते तेव्हा आपणाला जास्तीत जास्त आनंद वाटू लागताे.गीतेच्या अकराव्या अध्यायात अर्जुनाने देवाचे विश्वरूप पाहिले. ते रूप पाहून त्याला आनंद झाला. पण ताे आनंद त्याला नकाे हाेता. ताे कृष्णाला म्हणाला - पुरे करा, हे विश्वरूप आवरा.
 
मला पूर्वीप्रमाणेंच ‘किरीटिन गदिनं चक्रहस्तं’ ‘‘किरीट घातलेले, गदा धारण करणारे व हातात चक्र घेतलेले रूप दाखवा. त्यात मला खरा आनंद आहे.’’ ध्यान करत असताना आपणाला जाे अनुभव येताे त्यावरून आपली खात्री हाेते की - अर्जुनाचे म्हणणे अगदी याेग्य आहे.तू विचारतेस की - ‘आपण स्वतःची जी किंमत करताे व दुसरे लाेक आपली जी किंमत करतात त्यात फार तफावत असते. याचे कारण काय?’ याचे उत्तर असे की - आपण काय करू शकताे या गाेष्टीवर आपली किंमत आपण ठरवताे, तर आपण प्रत्यक्ष काय केले आहे या गाेष्टीवर दुसरे लाेक आपली किंमत ठरवतात.तू त्रासाबद्दल विचारले आहेस. तू असे लक्षात घे की - सुखाच्या डाेंगरावर चढताना ज्या पायऱ्या असतात त्यांचे नाव त्रास. आपण त्रासाच्या पायऱ्या चढू लागलाे म्हणजे मधे मधे विसाव्याची ठिकाणे असतात ही विसाव्याची ठिकाणे म्हणजे सुखाची ठिकाणे.