ओशाे - गीता-दर्शन

    14-Jun-2023
Total Views |
 
 

Osho 
टीचभर पाेरटी ती, पण शिक्षकाच्या नाकीनऊ आणतात. बिचाऱ्याला कधी एकदा घंटा हाेते आणि आपण पळताे, असं हाेऊन जातं.
तीस जिवंत मुलं.शिक्षकानं जरासं ताेंड वळवून फळ्यावर लिहावं म्हटलं की इकडे त्यांनी बंड पुकारलंच.तसं मनाेवेत्ते तर सांगतातच की फळा असताेच मुळी यासाठी की अधून मधून शिक्षकानं मुलांच्याकडे पाठ फिरवली पाहिजे, नाहीतर सहा-सात तास जर त्यानं आपली पाठ मुलांपासून दुसरीकडे वळवलीच नाही तर मुलांचा इतका काेंडमारा हाेईल. की ती आजारीच पडतील. तेव्हा थाेडीतरी माेकळीक पाहिजेच.
 
त्यांच्याकडे पाठ फिरवून त्याने फळ्यावर काही लिहायला सुरवात केली की ताेंड विचकणे, थट्टा मस्करी, ध्नकाबु्नकी सगळं लिहायला सुरुवात केली की ताेंड वळवलं की पुन्हा शिकायला सुरुवात हाेते.तेव्हा फळा तसा मुलांच्या फारच उपयाेगी असताे. त्याच्यामुळे शिक्षकाला अधूनमधून मागे बघावे लागते. पण ही जिवंत मुले आहेत.यांच्यावर मालकी? छाेट्यांवर मालकी करणं फार अवघड आहे.आईबापही आपल्या छाेट्यांना थाेडी-थाेडी भुरळ पाडतातच, लाच देतात.