गीतेच्या गाभाऱ्यात

    13-Jun-2023
Total Views |
 
 
पत्र विसावे
 
Bhagvatgita
अर्जुना, त्रिभुवनात मला काहीही कर्तव्य उरलेले नाही.अप्राप्त अशी एखादी वस्तु मिळवावयाची राहिलेली नाही तथापि मी कर्म करीतच आहे.गीतेची एक विशिष्ट पारिभाषिक भाषा आहे. गीतेने ‘अकर्म’ हा शब्द विशिष्ट अर्थाने वापरला आहे. त्याबद्दलचा ऊहापाेह मी पूर्वीच्या पत्रात केला आहे. त्यावरूनच तुला कळून येईल की - ‘अकर्म’ म्हणजे कर्मशून्यता नसून उच्च, उदात्त, उत्तुंग, शुद्ध, सात्त्विक माै्नितक, वंदनीय, नमनीय, कमनीय कर्म म्हणजे ‘अकर्म’.ज्ञानयाेग काय, कर्मयाेग काय किंवा भ्नितयाेग काय, त्या साऱ्यांची मदार आपले कर्म अकर्म व्हावे यावर आहे.तू आपल्या पत्रात लिहितेस. - ‘लाेकमान्य टिळकांच्या जीवनावर गीतेचा विलक्षण प्रभाव पडला हाेता. म्हणूनच खटल्यात ते न्यायमूर्तींना म्हणाले - Despite the verdict of the jury. I maintain that I am innocent. It may be the will of the Providence that the cause which I represent may prosper more by my suffering than by my remaining free.
 
खऱ्या गीताभ्नताचे हे उद्गार आहेत. हे उद्गार हृदयाला जाऊन भिडतात.सावरकर देखील गीतेचे भ्नत हाेते. त्यांच्या जीवनावर देखील गीतेचा विलक्षण प्रभाव पडला हाेता. त्यांच्यावर देखील सरकारने खटला भरला हाेता. लाेकमान्य टिळकांनी ज्याप्रमाणे हृदयाला भिडणारे उद्गार काढले याप्रमाणे सावरकरांनी कां उद्गार काढले नाहीत?अग! काेण म्हणताे सावरकरांनी उद्गार काढले नाहीत म्हणून? असे दिसते की - लाेकमान्य टिळकांच्या उद्गारांना ज्या प्रमाणांत प्रसिद्धी मिळाली त्या प्रमाणांत सावरकरांच्या उद्गारांना प्रसिद्धी मिळाली नाही.स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यावर सरकारने दाेन खटले भरले. ते एकाच न्यायाधीशासमाेर चालले. न्यायाधीशाने शिक्षा दिली की - प्रत्येक खटल्यामध्ये जन्मठेप.
 
त्यावेळी गीताभ्नत सावरकरांनी जे उद्गार काढले ते हृदयाला जाऊन भिडणारे आहेत. सावरकर म्हणाले.I am prepared to face ungrudingly the extreme penalty of your laws in the belief that it is through the sufferings and sacrifices alone that our beloved motherland can march on to an assured, if not a speedy, triumph.तू असे पहा की लाे. टिळकांचे उद्गार ज्याप्रमाणे हृदयाला जाऊन भिडणारे आहेत त्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देखील हे उद्गार हृदयाला जाऊन भिडणारे आहेत. हे उद्गार खऱ्या गीताभ्नताचे आहेत, याबद्दल तुझी खात्री पटेल.तू आपल्या पत्रात लिहितेस - ‘‘गीतेमुळे माणसाच्या मनावर चांगला परिणाम हाेताे व ताे चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करताे, हे मला मान्य आहे. मनुष्याचे जीवन सुधारणेच्या बाबतीत गीतेसारखा उत्कृष्ट ग्रंथ नाही, हेही मला मान्य आहे.मला अशी शंका आहे की - चाेराच्या मनावर गीतेचा काही परिणाम हाेताे का?