ओशाे - गीता-दर्शन

    12-Jun-2023
Total Views |
 
 

Osho 
 
अन् आपला माेहरा वस्तूंच्या मालकीकडे वळवताे. तिजाेरीत एक काेटी रुपये बंदिस्त असले की त्याला आपली ती मालकी जास्त सुरक्षित वाटते.अन् आपणाला एक काेटी लाेकांची मते पडून आपण पंतप्रधान झाला असाल तर पुढच्या निवडणुकीत पण पुन्हा एक काेटी मते पडतीलच असं समजायचं काहीएक कारण नाहीये. ते अन्प्रेड्निटेबल आहे. ती एक काेटी लाेकांची मालकी म्हणजे बे-भरवंशाची म्हैस.पण तिजाेरीतले हे बंदिस्त एक काेटी रुपये मात्र भरवंशाचे आहेत. या अर्थाने भरवंशाचे आहेत की ते जडवस्तू आहेत, तुमची मालकी अबाधित आहे.व्य्नतीवर मालकी गाजवणं हा धाे्नयाचा साैदा आहे.त्यामुळे जसजशी माणसाची समजखुळचटपणाने भरलेली समज वाढते, तसतसा ताे व्य्नतींशी संबंध कमी अन् वस्तूंशी संबंध वाढवत जाताे.
 
नवरा-बायकाे, दाेन मुलं, बस्स. पण आता ही कुटुंबं पण विखरू लागली आहेत. ती पण यापुढे वाचणार नाहीत.कारण पती-पत्नीमधले संबंधही फार गुंतागुंतीचे हाेत चाललेत. नजिकच्या भविष्यकाळात विवाह तरी वाचेल की नाही, हे सांगणं फार अवघड आहे. ज्यांना भविष्यकाळाचा काही बाेधही नसताे, तेवढीच माणसं फ्नत असं म्हणतील की कुटुंबं राहतील.पण कुटुंबं नाहीच वाचू शकणार. प्रचंड धाेके निर्माण झाले आहेत. ती विखरून जाण्याचीच भीती आहे.पण त्या जागी वस्तूंचा संग्रह वाढत जाताे.एक माणूस दाेन घरे बनवताे, दहा गाड्या ठेवताे, हजार ढंगाचे कपडे वापरताे. घरात सगळं सामावून घेताे.त्यामुळे माेठी कुटुंबं काेलमडून पडलीत. कारण माेठी कुटुंबं म्हणजे माेठ्या माणसांचं जाळं. लाेकांनी विचार केला, ‘इतकी माेठी कुटुंबं नकाेत बुवा.’ मग व्य्नितगत कुटुंब अस्तित्वात आली.