गीतेच्या गाभाऱ्यात

    12-Jun-2023
Total Views |
 
 
पत्र विसावे

Bhagvatgita 
चंद्रावर डाग आहे पण लक्ष्मणाच्या पावित्र्यावर अणुरेणू इतकाही कलंक नाही अशा त्या पावित्र्याच्या पुतळ्याला सीतेने कठाेर शब्द बाेलल्यावर लक्ष्मण रामाच्या दिशेने गेला व नंतर सीतेला रावणाने पळवून नेली.सीता जे लक्ष्मणाला बाेलली त्याचा अर्थ एक दिव्य महान स्त्री जीवनामध्ये खालच्या अवस्थेवर आली.तू विचारतेस कीगीता सांगणारा कृष्ण किती महान! त्याची पत्नी रु्निमणी देखील किती पतिव्रता! कृष्णावर तिची किती भक्ती! सत्यभामा अहंकारी हाेती पण रु्निमणी नम्रतेची पुतळी! अशा त्या महान पतिव्रतेचे नाव पंचकन्यांत का नाही? अहिल्या द्राैपदी सीता तारा मंदाेदरी तथा। पंचकन्या स्मरेन् नित्यम्..असे म्हटले आहे. त्यामध्ये अहिल्या, द्राैपदी, सीता, तारा, मंदाेदरी अशी पाच नावे आहेत. त्यामध्ये रु्निमणीचे नाव का नाही? तुझा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. मला वाटतं..
 
माणसाच्या जीवनांत दु:ख असल्याशिवाय ते जीवन दुसऱ्याच्या हृदयाला भिडत नाही. द्राैपदी, सीता यांच्या जीवनात किती अपरंपार दु:ख आहे! मनुष्य दु:खात कसा वागताे हे जाणून घेण्याची दुसऱ्यांना फार इच्छा असते.अत्यंत हालअपेष्टांमध्ये सीता व द्राैपदी जे उच्च उदात्त उत्तुंग जीवन जगल्या त्यामुळे मनुष्य भारावून जाताे. त्यांचे जीवन हृदयाला जाऊन भिडते.रु्निमणी महान पतिव्रता आहे. यात बिलकुल संदेह नाही. तिचा प्रेमविवाह हा साहित्याचा उत्कृष्ट विषय आहे, त्यात वाद नाही. पण, लग्नानंतर सीता व द्राैपदी यांना जसे महान दुःख भाेगावे लागले. तसे रु्निमणीला भाेगावे लागले नाही. अशी परिस्थिती असल्यामुळे लग्नानंतरचे तिचे जीवन हृदयाला जाऊन भिडत नाही.मला वाटते - पंचकन्यांमध्ये तिचे नाव न घेण्याचे कारण तसेच काहीसे असले पाहिजे.
 
तू विचारतेस.- ‘काही लाेक म्हणतात, ‘सारी गीता ऐकल्यानंतर देखील अर्जुन ज्ञानी झाला नाही. ताे अज्ञानीच राहिला. म्हणूनच त्याने कर्म केले. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कर्म वर्ज्य आहे अर्जुनाने गीता ऐकल्यानंतर कर्म केले. त्याचे कारण गीता ऐकून देखील ताे ज्ञानी झाला नाही; ताे अज्ञानीच राहिला’ तुम्हाला काय वाटते.मला वाटते - हे म्हणणे बराेबर नाही. ज्ञानेश्वरांनी शेवटच्या अध्यायांत म्हटले आहे.हृदया हृदय एक झाले । ये हृदयीचें ते हृदयीं घातलें । द्वैत न माेडता केले । आपणाऐसे अर्जुना ।। गीता सांगून कृष्णाने अर्जुनाच्या बाबतीत काय केले त्याचे हे उत्कृष्ट वर्णन आहे. गीता सांगून कृष्णाने अर्जुनाला आपणासारखे केले, असे ज्ञानेश्वर म्हणतात. अशा परिस्थितीत अर्जुन अज्ञानीच राहिला म्हणून त्याने कर्म केले असे कसे म्हणता येईल? तू आणखी असे पहा - भगवान कृष्ण ज्ञानी हाेते. त्यात तर कुणाचाच वाद नाही ना? ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कर्म वर्ज्य आहे, असें म्हणणाऱ्यांनी कृष्णाचेच उद्गार पाहावेत.गवान गाेपालकृष्ण तिसऱ्या अध्यायांत म्हणतात - न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लाेकेषु किंचन । नानवात्पमवात्पव्यं वर्त एवं च कर्मणि ।।