संतास जाे निंदी । अधम लाेभासाठीं वंदी ।।

    10-Jun-2023
Total Views |
 
 

saint 
 
मूळात संतांचा सहवास लाभयलाच भाग्य लागते आणि याेगायाेगाने असे भाग्य लाभलेच तर त्याला लाथाडायचे म्हणजे स्वत:च स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतल्यासारखे आहे.संत-सज्जनांना नांव ठेवल्यामुळे कांही स्वार्थी लाेकांकडून थाेडया वेळेपुरते माेठेपण जरी मिळाले तरी ते खऱ्या अर्थाने टिकणारे नसते.केवळ चांगल्यांना विराेध करावा एवढीच दृष्टी ठेवून वागणारा मुर्खच अशा लाेकांना माेठेपण देत असताे.म्हणून अशा खाेटारड्या माेठेपणासाठी आपल्याकडून संत सज्जनांना नांव ठेवण्याची घाेड चूक न हाेण्यातच आपले शहाणपण आहे.
 
श्रीमंत आणि सत्ताधिश लाेक माेठ्या प्रमाणावर आपणाला सापडतील, पण संत सज्जन सापडणे कठीण आहे, हे पण याप्रसंगी लक्षात असू द्यावे.आपणाला खऱ्या अर्थाने माेठे व्हायचे असेल तर आपल्यात चांगुलपणा निर्माण झाला पाहिजे. चांगुलपणाशिवाय प्राप्त झालेलामाेठेपणा व्यर्थ असताे. कारण सर्व माेठी माणसं चांगली असतातच असे नव्हे, मात्र सर्व चांगली माणसं खऱ्या अर्थाने माेठी असतात. पैसा आणि सत्तेशिवायही चांगलेपण मिळू शकते, हे संत ज्ञानदेव, तुकाराम, चाेखाेबा, निळाेबा, सेनाजी आदी संतांकडे पाहिल्यास लक्षात येते.
जय जय राम कृष्ण हरी। - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448