धन-संपत्ती काही नेहमीच आपल्याजवळ राहू शकणार नाही.म्हणून ईश्वरचरणी प्रार्थना करा की, मला ज्यावेळी संपत्ती देशील, साेबत सुबुद्धीही द्यावी.कारण सुबुद्धी जर असेल, तर संपत्ती मला घसरू देणार नाही. पुण्य हा लक्ष्मीचा भाऊ आहे. जिथे सुकृत कार्ये हाेतात, तिथे पुण्यप्राप्ती हाेतेच हाेते व तिथेच लक्ष्मीचा वास असताे. धनसंपत्ती विहिरीच्या पाण्यासमान आहे. विहिरीतले पाणी बाहेर काढले नाही, तर पिण्यायाेग्य राहात नाही. धन-संपत्ती पुण्याच्या कामासाठी वापरली नाही, तर सडल्याशिवाय राहत नाही.