ओशाे - गीता-दर्शन

    09-May-2023
Total Views |
 
 

Osho 
 
हवा शिडात भरते आणि नाव प्रवास करू लागते. ध्यानाच्या नावेचेही क्षण असतात, स्थिती असते. जेव्हा हवा अनुकूल असते...ध्यानाच्या बाबतीत हवा म्हणजे सूर्यकिरणंच हाेत. जेव्हा हवा अनुकूल असते, जेव्हा गुरुत्वाकर्षण अनुकूल असतं, जेव्हा तरंग अनुकूल असतात जेव्हा सर्व बाजूंनी अनुकूलता असते, तेव्हा शीड पसरू द्या. अगदी कमी श्रमात प्रवास हाेऊन जाईल.अन् जेव्हा सर्व गाेष्टी प्रतिकूल असतात, तेव्हा फारच मेहनत करावी लागते. मग दुसरा किनारा लागेलच अशी खात्री नसते. वारं जाेरात वाहतंय, नदीचा प्रवाह पण जाेरात आहे. आपण तर खूप कमजाेर आहात. तेव्हा दाट श्नयता ही आहे की आपण थकून किनाऱ्याला परताल, हात जाेडाल अन् म्हणाल, ‘हे काही आपल्याला जमणार नाही’. असंच घडतं.
 
जे लाेक ध्यानात जाऊ लागतात पण ध्यानाची व्यवस्था समजून घेत नाहीत, राईट-ट्यूनिंग समजून घेत नाहीत ते व्यर्थच त्रस्त हाेतात. मग संत्रस्त हाेऊन ते असा विचार करू लागतात, की ‘बहुतेक आपल्या नशिबात हे दिसत नाही.आपलं कर्म ठीक नाही, आपली नियती नाही.आपली पात्रता नाही.’ अशी स्वतःची समजूत घालून ते, ते जे व्यर्थाचे जग आहे तिकडेच परततात, आपल्या किनाऱ्याकडे परततात. असं हाेऊ नये यासाठी कृष्ण अर्जुनाला याेग्य त्याच प्राथमिक गाेष्टी सांगत आहे.प्रश्न - भगवानश्री, या श्लाेकातील आणखी दाेन गाेष्टी अधिक स्पष्ट हाेतील तर बरं हाेईल