चाणक्यनीती

    09-May-2023
Total Views |
 
 
 
Chanakya
 
4. माेक्ष - जीवनातील आध्यात्मिक उन्नती, त्यापासून मिळणारी अवर्णनीय शांती, परम सुख याचा अनुभव, परमेश्वराचा साक्षात्कार अर्थात ‘माेक्ष’.जन्म-मरणाच्या दृष्ट चक्रातून ‘मुक्ती’ याचा भागीदारही माणूस एकटाच असताे. या प्रवासात काहीकाळ ‘गुरू’, ‘गुरुमंत्र’ साेबत असताे; पण ‘माेक्ष’ फक्त त्याला एकट्यालाच मिळताे. उदाहरण वाल्या काेळ्याच्या पूर्वजन्माच्या पापाचे वाटकरी व्हायला त्याचे कुटुंबीय तयार नसते. ते फक्त त्याच्या मिळकतीत भागीदार असते; पण हे नारदमुनी निदर्शनाला आणून देतात. तेव्हाच त्याची चारित्र्य क्रांती हाऊन ताे वाल्मीकी बनताे.
 
बाेध : जन्म-मरणाच्या ेऱ्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत माणूस एकटाच असताे. ‘आये भी अकेला, जाये भी अकेला, ये दाेन दिन की जिन्दगी है, दाे दिनका मेला.’ याची जाण ठेवावी.