गीतेच्या गाभाऱ्यात

    09-May-2023
Total Views |
 
 
पत्र पंधरावे
 
 
Bhagvatgita
 
पुष्कळ लाेकांना असे वाटते. पण असे वाटणे म्हणजे आत्याबाईला मिशा असत्या तर- असे वाटण्यासारखे आहे.जगातील वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे.वस्तुस्थिती अशी आहे कीप्रत्येक माणसाला काही ना काही दु:ख असते.ज्याला अजिबात दु:ख नाही असा मनुष्य असत नाही.प्रश्न असा आहे कीदु:खाला ताेंड कसे द्यायचे? अथवा दु:खावर मात कशी करावयाची? गीता सांगते कीईश्वर प्रत्येकाच्या अंत:करणात आहे.तू असे लक्षात घे कीअंत:करणरूपी समुद्रात खाेल बुडी मारून आपण ईश्वराला समजून घेऊ लागलाे म्हणजे आपल्या दु:खातून सुखाचे माेती बाहेर येतात.आपण नुकतीच गालिबची जन्मशताब्दी साजरी केली.गालिबला किती भयंकर दु:ख झाले! त्याला उत्पन्नाचे साधन नव्हते. बापाच्या चुलत्याच्या मृत्यूनंतर गालिब लहान असताना लाेकांनी त्याच्या जहागिरीचा बराचसा भाग खाऊन टाकला, त्याला भीक मागावी लागली.
 
कर्ज काढावे लागले. त्याचे हाल हाल झाले. मरतानादेखील त्याला काळजी वाटत हाेती की आपल्या विधवा पत्नीचे दारिद्रयात कसे हाेईल? दारूण दु:खात पिचत असताना गालिबने अंत:करणाच्या समुद्रात खाेल बुडी मारून अंत:करणातील ईश्वराला समजून घेतले व जे माेती बाहेर आणले तेच त्याचे अजरामर काव्य.त्या काव्यात विश्ववेदनेचाच सूर आहे व दु:खावर मात कशी करावी त्याचा मंत्र आहे.तुकारामांना किती दु:ख भाेगावे लागले! पण अंत:करणातील ईश्वराला प्रेमाचे पाणी घातल्यावर या दु:खरूपी झाडाला सुखाची फळे लागली.स्वत:ला जाणून घ्या हाच तत्त्वज्ञानाचा महामंत्र आहे. आपण जाेपर्यंत स्वत:ला जाणून घेत नाही ताेपर्यंत दु:ख आपणाला साेडत नाही. आपण स्वत:ला जाणून घेतले म्हणजे सुखाच्या बगीच्यात आपण हिंडू लागताे.
 
प्रख्यात कादंबरीकार बालझाक याने टाेपण नावाने खूप कादंबऱ्या लिहिल्या. त्याला खूप पैसा मिळाला. पण ताे सुखी झाला नाही.
त्याला वाटे कीत्या कादंबऱ्यात खरा ‘मी’ नाही.त्याने ‘मी’ चा शाेध केला व मग एक कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली. कादंबरी लिहिताना त्याला अनुभव यावयाचा की, आतून काेणीतरी बाेलत आहे व आपण ते ऐकून लिहित आहाे. ताे सुखाच्या साम्राज्यात विहार करू लागला.त्या कादंबरीचे नाव अखेरचे बंड.या कादंबरीखाली त्याने लेखक म्हणून आपले नाव लिहिले.ओनाेरे बालझाक.त्याने ही कादंबरी आपल्या आईस अर्पण केली.तू असे लक्षात घे की, आपल्या अंतरंगात असणाऱ्या ईश्वराला स्पर्श झाला म्हणजे ‘मी’ चा शाेध लागताे. व मग दु:खाच्या पाण्यातून सुखाचे कमळ उमलू लागते.आपल्या अंतरंगात जाे ईश्वर आहे. त्याची ओळख करून घेण्याच्या आड जाे जाे विचार असेल त्याचा आपण पुरा बीमाेड केला पाहिजे.