वाच्यार्थ : जन्म-मृत्यू एकट्याच्याच वाट्याला येतात. चांगल्या-वाईट गाेष्टी एकट्यालाच भाेगाव्या लागतात. नरकयातना भाेगणे एकट्याच्याच वाट्याला येते आणि माेक्षाचा वाटेकरीही ताे एकटाच असताे.
भावार्थ : जीवनप्रवासात बऱ्याच टप्प्यांवर माणूस एकटाच असताे. काेणीही त्याच्या साेबत नसते.
1. जन्म-मृत्यू : मनुष्य जन्म घेताे. माेठा हाेताे, बाल्यावस्था, किशाेरावस्था, युवावस्था, प्राैढावस्था, वृद्धावस्था या चक्रातून जाऊन शेवटी मरण पावताे. या काळात त्याला त्याच्या पूर्व संचितामुळे माता-पिता, बंधू-भगिनी, आप्त, मित्र मिळतात. त्याला काही बाबतीत साथही देतात