आणखी काही दैवी गुणांचे वर्णन ज्ञानेश्वर गीतेच्या आधाराने करीत आहेत. जगाला सुख व्हावे म्हणून शरीराने, वाचेने, मनाने जे वागणे असते त्याला अहिंसा म्हणतात.कमळकलिका तीक्ष्ण असून मऊ असते. ते चंद्राचे तेज खरेच. पण ते सूर्यापुढे िफके असते. पाणी बुबुळाला घासले तरी ते डाेळ्यांना खुपत नाही. पण हेच पाणी डाेंगराच्या कडासुद्धा ाेडते. त्याप्रमाणे सत्य भाषण, संशय नाहीसा करण्याच्या कामी तलवारीसारखे तीक्ष्ण असते आणि ऐकताना कानांलाच मुखे ुटतात. सत्य आपल्या खरेपणाच्या जाेरावर ब्रह्मालाही भेदून जाते. ार काय सांगावे ? जे भाषण प्रियपणामुळे काेणालाही फसवू शकत नाही आणि काेणालाही खुपत नाही ते सत्य हाेय.पारध्याचे गाणे कानांना गाेड लागते, पण प्राण्यांना प्रसंगीघातक असल्याचे लक्षात येते.
अशा सत्यास आग लागाे. जे भाषण कानांनी ऐकले असता गाेड लागते, पण ज्याचा अर्थ काळजाला झाेंबताे, हे भाषण कितीही सुंदर असले तरी ते एक प्रकारच्या पिशाचीसारखेच आहे.मुलाचे कल्याण व्हावे म्हणून लटके रागावणारी आई लाड करण्यात ुलासारखी मऊ असते. या मातेप्रमाणे सत्याचे स्वरूप असते. ऐकणाऱ्यास सुख हाेते ते सत्य. द्वेषादि विकार उत्पन्न हाेत नाहीत ते सत्य. दगडाला पाणी घातले तर त्याला अंकुर कसा ुटणार? सर्पाच्या कातीस पाय लागला तरी ती फणा उगारत नाही, त्याप्रकारे लहान मुलालादेखील राग येईल अशा शिव्या दिल्या तरी ज्याला राग येत नाही, म्हणजे क्राेध उत्पन्न हाेण्याचे कारण असले तरी ज्याला राग येत नाही, त्याच्या या गुणास अक्राेध असे म्हणतात. ब्रह्मदेवांच्या पाया पडलेला मनुष्य आयुष्य संपल्यामुळे उठत नाही, त्याप्रमाणे ज्ञानी माणसाच्या मनात क्राेध उत्पन्न हाेत नाही.