99.99 अंशापर्यंत, या नव्व्याण्णव पूर्णांक नव्व्याण्णव शतांश अंशावर ताे जगत असला पाहिजे. फ्नत एक वाळलेलं पान गळलं आणि त्याचा शंभरावा अंश पूर्ण झाला. ताे वाफ हाेऊन उडून गेला.ताे जेव्हा लाेकांना सांगत सुटला की, ‘ज्ञान पाहिजे असेल, तर पानगळीच्यावेळी सु्नया झाडाखाली बसा, ध्यान करा, जेव्हा वाळलेलं पान गळतं तेव्हा ध्यान करा, मेडिटेट ऑन इट.त्यावर ध्यान करा. ज्ञानाची घटना हाेऊन जाईल.’ तेव्हा असं त्यानं सांगण्यात त्याची काही चूक नाही. ज्यांनी ऐकलं त्यांच्यापैकी कित्येकांनी पानगळीच्या झाडाखाली बसून प्रयत्न केलाही.
कारण, रिझाईसारख्यानं सांगितलं म्हणजे ते बराेबरच असणार. आणि रिझाईचे डाेळे ताे खरं बाेलताे आहे याची साक्षच देताहेत. खाेटं सांगायचं तर काही कारणही नाहीये. त्याचा आनंद सांगत आहे की, घटना घडली आहे. अन् सगळ्या गावाला ठाऊक आहे.पानगळीच्यावेळी ती घडली आहे. रात्री वाळकी पानं गळत हाेती त्यावेळी घडली आहे.सकाळी हा आम्हाला नाचत आलेला दिसला.रात्री उदास हाेता. सकाळी आनंदानं ओसंडून जात हाेता. रात्री काही घडलं आहे, ए्नस्प्लाेजन झालं आहे.खाेटं तर सांगत नाहीये. ताे स्वत: साक्षी आहे. त्याचं जीवन आहे. त्याची चमक, त्याचा सुगंध साक्षीला आहे.