जशी जळत नाही किंवा विझतही नाही, वर्षाॠतूतील पूर ओसरला आहे आणि गंगेचे स्वाभाविक स्वरूप स्पष्ट झाले आहे. त्याप्रमाणे प्रेम भाेगण्यास बुद्धी आपल्या रूपात प्रकट हाेते. चांगल्या किंवा वाईट विषयांच्या दर्शनाने चित्तात चलबिचल हाेत नाही. पती गावाला गेला असता पतिव्रता ज्याप्रमाणे वियाेगदु:ख सहन करते. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाची गाेडी लागल्यावर बुद्धी अनन्य हाेते. हीच सत्त्वशुद्धी हाेय. निष्काम पुरुषाने अग्नीमध्ये पूर्णाहुती द्यावी, त्याप्रमाणे चित्तवृत्ती निष्कामभावाने परमात्म्यास समर्पण कराव्यात. ज्याप्रमाणे कुलवान पुरुषाने आपली मुलगी चांगले कुळ पाहून द्यावी किंवा हा दृष्टांत राहू द्या.ज्याप्रमाणे भगवंतांच्या ठिकाणी लक्ष्मी निरभिमानी हाेऊन स्थिरावली, त्याप्रमाणे अनन्य भावाने याेगाच्या ठिकाणी वतनदार हाेऊन राहणे हा दैवी संपत्तीचा आणखी एक गुण आहे. अशाच वरील अनेक गुणांचे वर्णन ज्ञानेश्वरांनी आपल्या नेहमीच्या मार्मिक शैलीने केले आहे.