महासती सीतेलाही सुवर्णमृगाचा माेह झाला आणि रावणाकडून तिचे अपहरण झाले. माेहिनी बनलेल्या श्रीविष्णूचा माेह हाेऊन भस्म ासुर स्वहस्ते भस्म झाला. खरंच माेहासारखा दुसरा काेणताच शत्रू नाही.
3. क्राेध : क्राेध ही भावना हीन आणि विराेधी भावनांमध्ये येते. क्राेधाचा परिणाम मन, बुद्धी, हृदय, शरीर व आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींवरही हाेताे.आपल्याला राग आल्यावर डाेके गरम हाेते, हृदयाची गती वाढते, शरीरात कंप सुटताे, डाेळे लाल हाेतात, शरीर आकसते, हातांच्या मुठी वळल्या जातात, प्राणशक्ती कमी हाेते, तणावजन्य व्याधी हाेतात.प्रसंगी प्राणहानीही हाेते, स्वत:ची अथवा इतरांची.दावाग्नी, वडवाग्नी, कुठलाही अनल (अग्नी) काबूत आणता येताे; पण क्राेधाग्नी जिवंत असूनही व्यक्तीला कायम जाळत राहताे. श्रीशंकराचा तिसरा डाेळा, त्यातील क्राेधाग्नी व त्याचे परिणाम सर्वश्रुतच आहेत.