पत्र पंधरावे
‘‘परवा मी प्लँचेटवरील एक पुस्तक वाचत हाेते.आत्म्याशी बाेलणे. त्याला बाेलावणे वगैरे बद्दल माहिती वाचून मला माेठी माैज वाटली, आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी या साधनांचा उपयाेग हाेताे का?’’ या साधनांचा आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी उपयाेग हाेत नाही असा पुष्कळांना अनुभव आला आहे. गीता वाचून आपण आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी धडपडताे, पण ते साध्य करण्यासाठी तू म्हणतेस त्या साधनांचा उपयाेग हाेत नाही असे माननीय कन्हय्यालाल मुनशी म्हणतात. त्यांनी या बाबतीत एक सुंदर लेख लिहिला आहे. ते म्हणतात- ‘‘आत्म्याला बाेलावण्याबद्दल मी खूप प्रयाेग केले आहेत व खूप अनुभव घेतला आहे. संशाेधन देखील केले आहे.लाेकांनी केलेले खूप प्रयाेग पाहिले आहेत. काही आत्मे झालेल्या घटना बराेबर सांगतात पण त्यांची भविष्यवाणी खाेटी ठरते.
आत्म्याशी संपर्क साधणे ही कला आध्यात्मिक जीवनात बाधक आहे. हा संपर्क आत्मज्ञानाला बाधक आहे.’’ तू आपल्या पत्रात लिहितेस- ‘‘गीतेने क्राेधाच्या विरुद्ध काेरडे ओढले आहेत. पण क्राेध आवरणे कठीण आहे. क्राेध आला म्हणजे काय करावे? तुमचा एखादा मार्मिक अनुभव सांगा.’’ गीतेप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करत असताना क्राेधावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करणे जरूर आहे.आपल्या अंतरंगात विकार, विचार व विवेक असे तीन प्रांत आहेत. क्राेध आला की विकाराच्या प्रांतात ऊर्मी उठतात.त्या ऊर्मीप्रमाणे आपण वागू नये. विकाराच्या पलीकडे जाे विचाराचा प्रांत आहे त्या प्रांतातही ऊर्मी उठतात. त्या ऊर्मीआपण समजून घ्याव्या, पण तेथेच न थांबता विचाराच्या पलीकडे जाे विवेकाचा प्रांत आहे त्या प्रांतात जावे व त्या प्रांतात उठणाऱ्या ऊर्मी समजून घेऊन त्याप्रमाणे वागावे; अशा तऱ्हेने आपण क्राेधावर ताबा मिळवावा.मी शहापूरला न्यायाधीश असताना एका कज्ज्यात एका वकिलांनी मुदत मागितली. तेथून माझी लवकर बदली हाेणार हाेती. त्या कज्ज्यात पूर्वी बऱ्याच मुदती हाेत्या. त्यामुळे मी वकिलांना म्हटलेआता मुदत मिळणार नाही.
माझा हा निर्णय ऐकून ते वकील मलाच एकदम अद्वातद्वा बाेलले.साहजिकच मला राग आला. काेर्ट तुडुंब भरले हाेते.आता मी काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. माझ्या अंतरंगात विकाराच्या बऱ्याच ऊर्मी उठल्या हाेत्या. त्याप्रमाणे न वागता मी पलीकडच्या विचाराच्या प्रांतातल्या ऊर्मी पाहिल्या व मग त्या पलीकडल्या विवेकाच्या प्रांतात गेलाे.विवेकाचा संदेश पाहून माझ्या मुखावर तेज चमकू लागले. मी त्या वकिलांना म्हणालाे- ‘‘तुमचे हे बाेलणे म्हणजे कंटेम्प्ट ऑफ काेर्ट आहे. या बाबतीत तुमच्याविरुद्ध मला बरेच काही करता येईल. पण मला वाटते आज तुमची प्रकृती बिघडलेली असावी. कदाचित तुम्हाला हाय ब्लड प्रेशर झाले असेल.
कृपा करून आज तुम्ही आपली प्रकृती डाॅ्नटरांना दाखवा-’’ या बाेलण्याचा फार माेठा परिणाम झाला.पुढे जेव्हा माझी बदली झाली तेव्हा गावातर्फे माझा माेठा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते वकील आपल्या भाषणात गहिवरून म्हणाले -