पत्र अठरावे
कर्मफलाची आस्नती साेडून सदातृप्त असणारा व देवाशिवाय दुसरा आसरा न मानणारा मनुष्य कर्म करूनही काहीच कर्म करत नाही.गीतेचा सखाेल अभ्यास केला म्हणजे तुला कळून येईल की, आपला अहंकार गेला, आपली कर्मफळाची आस्नती सुटली व आपण जे कर्म करताे ते म्हणजे परमेश्वराची पूजा आहे अशी आपली भावना झाली म्हणजे आपल्या हातून कर्म हाेते त्याला पारिभाषिक भाषेत अकर्म म्हणतात.कर्माच्या विरुद्ध व ज्ञानाच्या बाजूने बाेलणारे शंकराचार्य आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर म्हणतात.
यद्यत्कर्म कराेमि तत्तदखिलं शंभाे तवाराधनम्। हे शंकरा मी जे जे कर्म करताे ते सर्व कर्म म्हणजे तुझी पूजा आहे गीतेत ‘अकर्म’ हाशब्द विशिष्ट अर्थाने वापरला आहे.ज्ञानयाेगाची सारी खटपट आपले कर्म ‘अकर्म’ व्हावे याबद्दल आहे. गीतेचा कर्मयाेग तू समजून घे. कर्मयाेगात देखील अहंकार नाहीसा करण्यावर भर आहे.
कर्मयाेगांत कर्मफळाच्या आस्नतीला रामराम ठाेकणेचा आहे. आपण जे कर्म करताे ते म्हणजे परमेश्वराची पूजा आहे. अशी कर्मयाेगात भावना ठेवण्याची असते. अशा तऱ्हेने कर्म केले म्हणजे ते ‘अकर्म’ हाेते. कर्मयाेगाची देखील सारी खटपट आपले कर्म ‘अकर्म’ व्हावे याबद्दल आहे.म्हणूनच गीतेच्या पाचव्या अध्यायात भगवान गाेपालकृष्ण म्हणतात.सांख्ययाेगाै पृथक् बाला: प्रवदंति न पंडिता:। एक सांख्यं च याेगं च य: पश्यति स पश्यति।। ज्ञानयाेग आणि कर्मयाेग हे वेगळे आहे असे मूर्ख लाेक म्हणतात, पंडित तसे म्हणत नाहीत. ज्ञानयाेग काय किंवा कर्मयाेग काय ते एकच आहेत. हे ज्याला कळले ताेच शहाणा.गीतेतील कर्माचा व्यापक अर्थ समजावून घेतलास व ‘अकर्म’ म्हणजे कर्मशून्यता नसून गीतेने ‘अकर्म’ याचा विशिष्ट पारिभाषिक अर्थ केला आहे हे तुझ्या लक्षात आले म्हणजे तुला समजेल की, ज्ञानयाेग काय किंवा कर्मयाेग काय दाेन्ही एकच आहेत.
हल्लीच्या भाषेत बाेलायचे म्हणजेअकर्म म्हणजे कर्मशून्यता नव्हे तरशुद्ध सात्त्विक भाैतिक उच्च उदात्त उत्तुंग वंदनीय नमनीय वकमनीय कर्म म्हणजे अकर्म.गीतेची मदार अशा अकर्मावर आहे. असल्या अकर्माच्या धाग्यानी गीतेचे वस्त्र विणले आहे. अकर्मरूपी बीजापासून झालेले झाड म्हणजे गीतेचे झाड. गीतेच्या गाभाऱ्यात गाेपालकृष्ण ज्या चाैरंगावर विराजमान झाला आहे ताे अकर्माचा चाैरंग आहे. या चाैरंगाचा एक पाय आहे अहंकारनाशाचा, दुसरा पाय आहे अनास्नतीचा, तिसरा पाय आहे निष्कामतेचा, व चाैथा पाय आहे भ्नितभावनेचा.तू असे लक्षात घे कीअहंकारनाशाच्या फुलांनी, अनास्नतीच्या धूपारतीने, निष्कामतेच्या नैवेद्याने अंत:करणातील दिव्यश्नतीची केलेली पूजा म्हणजे अकर्म.हे अकर्म ज्याला समजले त्याला गीता समजली.दादाेबांच्या व्याकरणात पहिले वा्नय असे आहे.