स्थळ नव्हे आपला स्वभाव बदला. जागा बदलल्यानंतर जागा बदलण्याची गरज पडत नाही. शाळा बदलल्याने इयत्ता थाेडीच बदलते? शाळा तर कुणीही बदलू शकते; पण इयत्ता तर पास हाेऊनच बदलता येते. आपल्याला शाळा नाही, तर इयत्ता बदलायची आहे. त्यासाठी परीक्षेत उत्तीर्ण हाेणे गरजेचे आहे. आपल्याला जागा नव्हे; आपला स्वभाव बदलायचाय. आपल्याला परिस्थिती नव्हे; आपली मन:स्थिती बदलायची आहे.