पत्र अठरावे
‘‘माझा आश्रम जवळच आहे. मुली, तू शुद्ध आहेस ह्याबद्दल माझी खात्री आहे. मी तुझा बाप आहे. मुलीचे पहिले बाळंतपण बापाच्या घरी हाेणेचे असते. चल माझ्या आश्रमात.’’ ते प्रमाने भरलेले शब्द ऐकून दु:खी कष्टी सीतेच्या डाेळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ती मनात म्हणू लागलीदु:खाच्या वाळवंटात देखील सुखाचे झरे असतात.तू विचारतेस- ‘‘शंकरचार्यांनी गीतेचे तात्पर्य ज्ञानयाेग असे काढले व आत्मज्ञानानंतर कर्म नाही असे म्हटले. त्यांच्या मते सूर्यप्रकाश झाल्यानंतर ज्याप्रमाणे अंधकार असत नाही.त्याप्रमाणे ज्ञानानंतर कर्म असत नाही. लाेकमान्य टिळकांनी गीतेचे तात्पर्य कर्मयाेग असे काढले व ज्ञानाेत्तर देखील कर्म केले पाहिजे, असा आग्रह धरला.
तुम्ही म्हणता- खाेलीत जाऊन पाहिले म्हणजे ज्ञानयाेग व कर्मयाेग एकच आहेत. ह्या बाबतीत माझा घाेटाळा झाला आहे. कृपा करून हा विषय मला नीट समजाऊन द्या-’’ प्रश्न चांगला आहे. गीतेच्या अध्यासात रंगून गेल्याशिवाय असले प्रश्न विचारता येत नाही. तू गीतेच्या अभ्यासात रंगून गेली आहेस. हे भाग्याचे लक्षण आहे.गीतेच्या तिसऱ्या अध्यायात म्हटले आहेन हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्। काेणीही मनुष्य काही ना काही कर्म केल्याशिवाय क्षणभर देखील राहात नाही.गीतेची कर्माची कल्पना फार व्यापक आहे. जाेपर्यंत प्राण आहे ताेपर्यंत मनुष्य काही ना काही तरी कर्म करणारच.पाहाणे, ऐकणे, बैसणे, इतकेच काय श्वासाेश्वास घेणे हे ेखील व्यापक अर्थाने कर्म आहे.
कर्माचे व्यापकत्व लक्षात घेऊन तुझ्या लक्षात येईल कीगप्प बसले असता आपण कर्म करत नाही असे आपणाला वाटते.पण गीतेची दृष्टी वेगळी आहे. जाेपर्यंत मनुष्य जिवंत आहे ताेपर्यंत ताे एक क्षणभर देखील कर्म केल्याशिवाय राहात नाही.आपण गप्प बसलाे असता पाहाताे, ऐकताे, श्वासाेश्वास घेताे. गीता म्हणते हे देखील कर्मच आहे.कर्माचा हा व्यापक अर्थ लक्षात घेतला म्हणजे आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर देखील मनुष्यकर्म करताे ह्यात शंका नाही.आता तू जरा सखाेल विचार कर.गीतेत ‘अकर्म’ असा शब्द आला आहे.
‘अकर्म’ म्हणजे कर्मशून्यता नव्हे. कारण कर्मशून्यता जिवंत प्राण्याला श्नय नाही, ‘अकर्म’ हा परिभाषिक शब्द आहे.गीतेच्या पाचव्या अध्यायात म्हटले आहेनैव किंचित् कराेमीति यु्नताे मन्येत तत्त्ववित्। याेगयु्नत तत्त्ववेत्या पुरुषाने ‘मी काहीच करत नाही’ असे समजावे.गीतेत असेही म्हटले आहेअहंकारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते। अहंकाराने मूढ झाल्यामुळे आपण कर्ता आहे असे मनुष्याला वाटते.अहंकारनाश हा गीतेचा पाया आहे.गीतेच्या चवथ्या अध्यायात म्हटले आहे: त्य्नत्वा कर्मफलासंगं नित्यतृप्ताे निराश्रय:। कर्मण्यभिप्रवृत्ताेऽपि नैव किंचित् कराेति स:।।