असं म्हणतात की, आईचा तिच्या मुलावर प्रभाव पडताे. मात्र, आजचे मूल आईऐवजी ‘मीडिया’ कडूनच जास्त प्रभावित हाेत चालले आहे. काल परवापर्यंत असे म्हटले जायचे की, हा मुलगा त्याच्या आईवर गेलाय आणि हा त्याच्या बापावर ! परंतु आज टीव्ही चॅनेल्स् हिंसा आणि अश्लीलतेला त्यांच्या चॅनेल्स्मधून दाखवत आहेत. त्याकडे पाहून असे वाटते की, उद्या असे म्हटले जाईल, हा मुलगा झी टीव्हीवर गेलाय आणि हा स्टार टीव्हीवर तर ही जी उनाड आहे ना ही तर पूर्णपणे फॅशन टीव्हीवरच गेली आहे.