ओशाे - गीता-दर्शन

    03-May-2023
Total Views |
 
 
Osho
तुमच्या वितळण्यासाठी भयंकर उष्णतेच्या भट्ट्या पाहिजेत. तेव्हा कदाचित तित्नयाच तीव्रतेनं तुमची वाफ हाेईल. म्हणून काही वेळा असं हाेतं, पूर्वीच्या जन्मामध्ये ज्याची बरीच साधना झाली म्हणजे ज्याची जवळजवळ सगळीच यात्रा झाली, फ्नत इंचभर वा अर्धाच इंच शिल्लक राहिली अशा साधकाला जर थाेडासा झटका मिळाला, आणि अगदी क्षुल्लक गाेष्ट .... कुठलीही क्षुल्लक गाेष्ट... तर मग आपल्याला वाटतं की एवढ्याशा गाेष्टीनं ही महान घटना कशी काय हाेऊ शकते? रिझाई हा असाच एक फकीर हाेता, त्याला अशाच एका छाेट्याशा गाेष्टीनं जाग आली हाेती. एका झाडाखाली ताे रात्री झाेपला आहे, पानगळीचे दिवस आहेत. अन् झाडाची पिकली पाने खाली गळून पडताहेत. ताे उभा राहून नाचू लागताे अन् गावाेगाव सांगत सुटताे की जर कुणालाही ज्ञान पाहिजे असेल तर त्यानं हेमंत ऋतूत झाडाखाली झाेपावं आणि जेव्हा पिकली पानं गळून पडतात तेव्हा ज्ञान प्राप्त हाेते. त्याला तसं ज्ञान झालं. पिकलेलं पान तुटून पडताना पाहून सगळं जीवनही त्याच्यासाठी पिकल्या पानासारखं गळू