या ही ओवीत ज्ञानेश्वर आपल्या सद्गुरूंचे ममत्वाने वर्णन करीत आहेत. यांची स्तुती करण्यासाठी मध्यमा, पश्यंती, परा या वाणी समर्थ हाेत नाहीत. श्रीगुरूनाथा, तुमचे स्वागत कसे करावे ? दरिद्री पुरुषाला अमृताच्या सागराचे दर्शन झाले की ताे त्याला भाजीपाला मेजवानी म्हणून देताे.खरे म्हणजे अमृताच्या सागराच्या दर्शनाने झालेला आनंद हाच खरा अनुभव आहे. काडवातीने सूर्याला ओवाळताना केवळ भक्तीच पहावी. बालकाला कळेल तर बालपण काेठे राहिले? पण जी बाई त्याची आई असते तिला खराेखरच संताेष हाेताे. गावातील पाणी गंगेला मिळाल्यावर ती त्याला दूर सर असे म्हणत नाही.अंधाराने भरलेले आकाश सूर्यासमाेर आलेले असता सूर्य त्याला दूर करीत नाही. गुरुवर्या, एका पारड्यातसूर्यास व दुसऱ्यात तुम्हांस घालून मी वजन केले ते आपण कृपा करून सहन करावे.
ज्या ध्यानाच्या डाेळ्यांनी तुम्हांस पाहिले. वेदादिकांच्या वाचेने तुमचे वर्णन केले.तसे तुम्ही माझेही स्तवन सहन करावे. आज मी माझ्या गुरूंचे वर्णन करण्यास तत्पर झालाे आहे. मी ताे माझा अपराध समजणार नाही आणि वर्णन न करता अर्धपाेटीही उठणार नाही. मी गीता या नावांचे प्रसादामृत सेवन करावे म्हणून वर्णन करू लागलाे ताे माझे दैव दुप्पट जाेराने उत्कर्षास पावले. महाराज, माझ्या वाणीने सत्य बाेलण्याचे तप आतापर्यंत पुष्कळ वर्षे केले. या तपाचे फळ म्हणजे हे गीता व्याख्यानरूपाने माझ्या हाती आले.मी आजपर्यंत अनेक पुण्यकर्मे केली, आणि आज ॠणमुक्त झालाे. देवा, माझी सर्व दुर्दशा तुम्ही दूर केली. गीतारूपी तुझी कीर्ती आम्हांस वर्णन करण्यायाेग्य झाली. यामुळे दरिद्री पुरुषाच्या घरी सहज काैतुकाने लक्ष्मी आली, असेच झाले.