चाणक्यनीतीChanakya

    03-May-2023
Total Views |
 
 

Chanakya 
 
वाच्यार्थ : कामवासनेप्रमाणे दुसरा दुर्धर आजार नाही, माेहासारखा दुसरा शत्रू नाही, क्राेधासारखा दुसरा अग्नी नाही आणि ज्ञानासारखे दुसरे सुख नाही.
 
भावार्थ : काही गाेष्टी अतुलनीय असतात.
 
1. कामेच्छा : कामेच्छा बळावल्यास शरीर कमकुवत आणि मन विकृत बनते. त्यामुळे त्यावर नियंत्रण असायला हवे. कामासक्त व्यक्तीला सदसद्विवेकबुद्धी साेडून जाते.तिला वेळ, काळ, आप्त, मित्र कशाचेही भान नसते. इतर व्याधींवर इलाज आहेत; पण या व्याधीवर इलाज नाही. ही व्याधी महाभयंकर आहे. कामासक्त व्यक्ती विचारहीन, विवेकहीन, भावनाशून्य, अत्याचारी बनते. ‘माणूस’ तर राहत नाहीच; पण पशूहूनही भयंकर बनते. अशा व्यक्तीला एड्सप्रमाणे भयंकर आजारही जडतात; इतरांकडे ते संक्रमितही हाेतात.
 
2. माेह : माेह ही विराेधी शक्ती आहे. त्याने बुद्धी भ्रष्ट हाेते. तसेच अध:पतनाचे मूळ आहे.पृथ्वीवरील प्रथम स्त्री ‘इव्ह’ला ‘इडन गार्डन’म धील ‘अ‍ॅपल’चा माेह झाला. ‘अ‍ॅडम’लाही तिने भरीला घातले आणि त्यानंतर मनुष्यजात दु:खाच्या शृंखलेत अडकत गेली.