पत्र पंधरावे
असे म्हटले जाते की, शृंगाररस हा रसांचा राजा आहे.परमार्थमार्गात बराच प्रवास केल्यानंतर आपणाला कळून येते की, शृंगाररस हा रसांचा राजा नसून शांतरस हा रसांचा राजा आहे. शांतरस शृंगाररसापेक्षा सरस आहे. शृंगाररसात न्हाऊन निघाल्यानंतर पति-पत्नींना वाटते की आपण सुखाच्या सागरात न्हाऊन निघालाे आहाे पण शांतरसात न्हाऊन निघाल्यानंतर पतिपत्नीला वाटते की, संसाराचा स्वर्ग झाला आहे. मेल्यानंतर स्वर्ग मिळताे ही कल्पना चुकीची असून अंत:करणातील देवाच्या प्रसादाने पराशांति प्राप्त झाली म्हणजे याचि देही याचि डाेळा स्वर्ग प्राप्त हाेताे.गीता वाचून काही लाेक सत्यसृष्टीत उतरतात, तर काही लाेक स्वप्नसृष्टीत जातात. तू सत्य व स्वप्न याबद्दल प्रश्न विचारला आहेस. त्याचे उत्तर एका गाेष्टीने देता येईल.
‘‘काेण माेठं?’’ याबद्दल एकदा सत्य व स्वप्न यांचे भांडण जुंपले. शेवटी ते भांडण ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणाले- ‘‘भूमीवर उभा राहून ज्याचे हात आकाशाला भिडतील ताे माेठा.’’ सत्य भूमीवर उभे राहिले, पण कितीही प्रयत्न करून त्याचे हात आकाशाला भिडेनात. सत्य निराश झाले.स्वप्नाने प्रयत्न सुरू केला. त्याचे हात आकाशाला भिडले पण त्याचे पाय भूमीवर राहीनात. स्वप्न निराश झाले.ब्रह्मदेव म्हणाला- ‘‘तुम्ही परस्परांना पूरक आहा. आणि पूरक राहण्यातच मजा आहे. जीवनाला सत्य व स्वप्न अशा दाेन बाजू आहेत.दाेन्ही परस्परांना पूरक आहेत. ‘काेण माेठं’ हा वाद तुम्ही करण्यात अर्थ नाही.’’गीतेइतका उत्तम ग्रंथ जगात नाही. आकाशाला उपमा आकाशाची सागराला उपमा सागराची त्याप्रमाणे गीतेला उपमा गीतेचीच. या दृष्टीने खालील श्लाेक तयार करता येईल.गगनं गगनाकारं सागर:सागराेपम:। गीतेश्वरी महाविश्वे गीतेश्वरीव विद्यते।। महात्मा गांधी लंडनला गेले असताना ते एका माेठ्या ग्रंथालयात गेले.
त्यांनी ग्रंथपालाला विचारले- ‘‘परमार्थावर तुमच्याकडे जी पुस्तके आहेत त्यापैकी जास्तीत जास्त मागणी काेणत्या पुस्तकाला आहे?’’ गं्रथपाल म्हणतात- ‘‘गीतेला’’ माणसं आपल्या जीवनाचं तत्त्वज्ञान ठरवत असतात.प्रा.ना.सी.फडके म्हणतात- ‘‘विश्व व मानवी जीवनाचं अंतिम स्वरूप अज्ञात आहे, आणि अज्ञेयच राहील. माणसाला जाे जाे अनुभव मिळताे व भाेवतालच्या जगात जे जे बरे वाईट घडलेले ताे पाहताे, त्याला कसलाही कायदा नाही, कसलाही अर्थ नाही.त्याची चाैकशी करण्याचे साेडून द्यावे. वाट्याला येणारे दु:ख माणसाने धैर्याने साेसावे. सुख समाेर आले तर त्याचा मु्नत चित्ताने उपभाेग घ्यावा. चांगल्यातलं चांगल हाेईल अशी आशा ठेवावी. वाईटातलं वाईट तर त्याचीही तयारी ठेवावीहे माझ्या जीवनाचे तत्त्वज्ञान आहे, आणि या तत्त्वज्ञानाच्या बैठकीवर मी सुखात आहे-’’ शाेपनहाॅवरने उपनिषदांच्या उपदेशावर आपल्या जीवनाचे तत्त्वज्ञान ठरवले.गीतेच्या उपदेशाच्या पायावर तू आपल्या जीवनाच्या तत्त्वज्ञानाची इमारत बांध म्हणजे तू सुखी हाेशील.तू लिहितेस-