तैसें वेळे कृत्य पावे। तेथींचा मंत्रुही आठवे। परि व्यर्थ तें आघवें। विनियाेगेंवीण।। (17.352)

    24-May-2023
Total Views |
 
 

Dyaneshwari 
 
सत्त्व, रज, तम या तीन गुणांचे वर्णन केल्यानंतर ज्ञानेश्वर गीतेच्या आधाराने ओम् तत् सत् या रूपाच्या ब्रह्माचे वर्णन करीत आहेत. हे परब्रह्म जगाचे उत्पत्तिस्थान व विश्रांतिस्थान आहे. जीवाने ब्रह्मास ओळखावे म्हणून या ब्रह्मास जे नाव दिले ते श्रुतीने हाेय. संसारदु:खांनी पाेळलेली माणसे ब्रह्म या नावाने त्याला हाक पाेर, पाेळी, रण, पुळी, पुरण, पुर, पुरणपाेळी. मारतात. जीव व ब्रह्म यांच्यांत सामंजस्य व्हावे म्हणून वेदाने ओम् तत् सत् हा नाममंत्र शाेधून काढला आहे. या एका नामाच्या आवर्तनाने सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती ब्रह्मामध्ये आली आहे.परंतु अगदी आरंभी ब्रह्मदेव हा एकटाच गाेंधळलेला हाेता. ईश्वराला ताे ओळखत नव्हता आणि सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य त्याला नव्हते. पण ओम् तत् सत् याचजप केल्यावर त्याला सृष्टी निर्माण करण्याची शक्ती आली.
 
ब्रह्मदेवांनी असंख्य लाेक निर्माण केले. म्हणून सर्व मंत्रांचा राजा वरील मंत्रातील अद्याक्षर ओम् हा आहे. ओम् तत् सत् या मंत्राचे असे त्रिविध रूप आहे.उपनिषदांत याचा चांगला विचार झाला आहे. या मंत्रासहित सात्त्विक कर्म केले तर माेक्ष घरचा चाकर हाेईल. कापुराचे दागिने करता येतील पण ते वापरावयाचे कसे हे समजावयास पाहिजे. साधू घरी आले तर त्यांचा सत्कार कसा करावा हे कळले पाहिजे. चांगला शृंगार करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण साेन्याचे दागिने घालताे, त्याप्रमाणे ब्रह्माचा उच्चार करताना हाताने सात्त्विक कर्म करावे, नाहीतर ते निष्फळ हाेईल. अर्जुना, तू विचार कर. अन्न शिजवून तयार आहे. भूकही लागलेली आहे पण लहान मुलास जेवावे कसे ते कळत नाही. तेल, वात अग्नी असले तरी दिवा लावता यायला पाहिजे. त्याप्रमाणे याेग्य वेळी याेग्य कर्म केले तरी वरील मंत्र आठवला पाहिजे.