गीतेच्या गाभाऱ्यात

    24-May-2023
Total Views |
 
 

Bhagvatgita 
पत्र सतरावे
 
‘‘आमच्या गावी महिला मंडळ आहे, त्या मंडळात मी जाते. सर्व महिलांमध्ये मी फार श्रीमंत आहे, पण त्या महिलांनी मला अध्यक्ष न निवडता एका गरीब बाईची अध्यक्ष म्हणून निवड केली. यामुळे मी पराकाष्ठेची दु:खी आहे. मला जीवन नकाेसे झाले आहे. माझ्या मनात आत्महत्येचे विचार येतात-’’ पाहिलंस हा विषण्ण मनाचा प्रकार.गीता वाचून तू प्नकी खूणगाठ बांध कीअंतरंगातील दिव्यश्नतीचे सारथ्य पत्करल्याशिवाय विषण्ण मनाला प्रसन्नता येत नाही.मन प्रसन्न झालं की सर्व दु:खे नाहीशी हाेतात. म्हणूनच गीतेत म्हटले आहे.प्रसादे सर्वदु:खानां हानिरस्याेपजायते। अंतरंगातील दिव्यश्नती तुझे सारथ्य कराे, तुझे मन प्रसन्न हाेवाे व तू सुखी हाेवाे, इतकीच इच्छा.असाे, बाकीचा मजकूर पुढील पत्री.
 
तुझा राम * * *
 
पत्र अठरावे
 
प्रिय जानकी, तुझे पत्र पावले, गीतेमध्ये तिसऱ्या अध्यायाचा 42 वा श्लाेक असा आहे.इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्य: परं मन:।मनसस्तु परा बुद्धिर्याे बुद्धे: परतस्तु स: ।।42।। (इंद्रिये पलीकडची आहेत. इंद्रियांच्या पलीकडे मन आहे.मनाच्या पलीकडे बुद्धी आहे. बुद्धीच्या पलीकडे ताे आहे.) तू विचारतेस.‘‘दांडेकरांच्या ज्ञानेश्वरीत दांडेकरांनी स:=ताे - याचा अर्थ काम असा केला आहे. तर लाे.
टिळकांनी स:= ताे याचा अर्थ आत्मा असा केला आहे.तरी त्या बाबतीत तुमचा निकाल सांगा.’’ हे पहा त्या बाबतीत बराच वाद आहे. रामानुजाचार्यांनी ‘ताे’ याचा अर्थ काम असा केला आहे. दांडेकरांनी ‘ताे’ याचा अर्थ काम असा केला आहे, तर शंकराचार्यांनी ‘ताे’ याचा अर्थ आत्मा असा केला आहे.
 
दांडेकरांच्या सार्थ ज्ञानेश्वरीत ‘ताे’ याचा अर्थ काम असा केला असला, तरी ज्ञानेश्वरीमध्ये स:= ताे म्हणजे काेण याबद्दल ज्ञानेश्वरांनी काहीच सांगितले नाही.व्याकरणदृष्ट्या पाहिले, तर ताे याचा अर्थ काम हे बराेबर आहे.कारण 42 व्या श्लाेकाच्या पूर्वी कामाचा उल्लेख आहे.आत्म्याचा उल्लेख नाही.‘‘राम तेथे आला व ताे बाेलला.’’ या वा्नयात ‘ताे’ याचा अर्थ राम असाच हाेताे. कारण पूर्वी राम असा शब्द आहे व नंतर ताे असे म्हटले आहे.42 व्या श्लाेकात स:= ताे असे आहे.या श्लाेकाच्या पूर्वी आत्म्याचा अजिबात उल्लेख नसल्यामुळे व्याकरणदृष्ट्या ‘‘ताे’’ म्हणजे काम हे म्हणणे बराेबर वाटते.