ओशाे - गीता-दर्शन

    22-May-2023
Total Views |
 
 

Osho 
 
पश्चिमेकडे एक विचारवंत आहे रॅन हुबार्ड. चुकून ताे ध्यान म्हणजे दिवास्वप्न असं समजला, डाेळे बंद करून जे स्वप्नात हरवून जाणं म्हणजेच ध्यान असे ताे समजला. भारतात समजून -उमजूनच या गाेष्टीवर भर दिला गेला की डाेळे सताडही उघडे राहू नयेत, कारण जर ते असे पूर्ण उघडे राहिले तर बाहेरचं जग एकदम यथार्थ हाेऊन जाईल...वा पूर्ण बंदही हाेऊ नयेत. नाहीतर आतली स्वप्नांची दुनिया खूप खरी हाेऊन जाईल....दाेहाेंच्या मध्यभागी साेडून द्यायचं आहे. हेही एक संतुलन आहे. हीही एक समता आहे. हाही एक द्वंद्वातील मध्याचा थांबा आहे. ना पूर्ण उघडे डाेळे, ना पूर्ण झाकलेले, अर्धाेन्मीलित.हा जाे निम्मा उघडा डाेळा आहे त्याचं माेठं गूढ आहे.
 
अर्ध्या उघड्या डाेळ्यांनी आतली स्वप्नं निर्माण करणं अवघड आहे आणि बाह्यजग यथार्थ आहे, असेही मानणे अवघड आहे. जणू काही एखादा घराच्या उंबरठ्यावर उभा आहे.अजून घराच्या बाहेर गेला आहे असं नाही अन् त्यानं घराच्या आत प्रवेशही केलेला नाही, ताे मध्येच थांबलेला आहे.आणि जेव्हा दृष्टि नासाग्र असते, तेव्हा आपल्याला आणखी एक अद्भुत अनुभव येईल. हा त्याचा दुसरा भाग आहे. दृष्टि नासाग्र असताना आज्ञाचक्रावर जाेर पडल्याचा अनुभव आपणास येईल. दाेन डाेळ्यांच्या बराेबर मध्यभागी त्या मध्यबिंदूवर जाेर पडत आहे, असा अनुभव येईल. जेव्हा डाेळे अर्धे उघडे असतील अन् आपण नासाग्र पहात असाल तेव्हा आपण नासाग्र तर पहाल पण नासाग्रावर जाेर येईल.आपण नाकाचे टाेक पहाल पण जाेर नाकाच्या मागील भागावर पडू लागेल.