पत्र सतरावे
असली वर्णने वाचून तुझ्यासारखे लाेक भ्नतीला नावे ठेवतात. पण तू असे लक्षात घे की, विषयसुख आणि भ्नतीसुख यात कमालीचे अंतर आहे.भ्नितसुखात कमालीचा पराकाष्ठेचा आनंद असताे.तू अशी खूणगाठ बांध की- भ्नतीसुखात पराकाष्ठेचा प्रेमभाव असताे. त्यात कामवासनेचा अभाव असताे.कबीर म्हणतात, काम बलवान तह प्रेम कहें पाइये। प्रेम चहाँ हाेय तहँ काम नही। कहै कबीर यह सत्त विचार है। समझ विचारक देख माँ ही। जेथे काम प्रबळ हाेताे तेथे खरे प्रेम मिळणार नाही. जेथे खरे प्रेम आहे तेथे काम आढळणार नाही. कबीर म्हणतात, हा सद्विचार आहे. याचा तू विचार करून बघ.लाेक म्हणतात, कृष्णाने गाेपींची कामवासना भागवली.हा विचार चूक आहे. गाेपींची भ्नती म्हणजे पराकाष्ठेचे प्रेम. त्यात कामवासना अजिबात नाही. ते जिवाशिवाचे, मनुष्याचे व ईश्वराचे, आत्म्याचे व परमात्म्याचे मीलन आहे.
म्हणूनच कबीर म्हणतातकबीर कबीर ्नया कहे कबीर। एक गाेपीके प्रेममे बह गये काेटी कबीर।। तू म्हणशीलअसे जर आहे तर भ्नतीचे वर्णन करताना प्रियकर व प्रेयसी यांची उपमा देऊन शृंगाराचे वर्णन कशाला करण्यात येते.त्याचे कारण असे की- भ्नत व ईश्वर यांचे प्रेम अवर्णनीय आहे. ते वर्णन करण्याच्या पलीकडचे आहे. त्यातील उत्कटता वर्णन करण्याच्या पलीकडची आहे. त्यात कामवासना अजिबात नाही, पण लाेकांना काहीतरी समजावे त्यांना थाेडासा तरी बाेध व्हावा म्हणून त्यांच्या भाषेत बाेलताना नाईलाजाने प्रियकर व प्रेयसी यांचे प्रेमप्रकार वर्णन करावे लागतात. ती स्थिती वर्णन करायला दुसऱ्या उपमा देता येत नाहीत.
म्हणूनच ज्ञानेश्वर म्हणतात, म्हणाेनि गा आम्हां। वेगा आली उपमा। एरव्ही काय प्रेमा। अनुवादु वसे।। हा विचार तू नीट लक्षात घे. लाेकांना थाेडातरी अर्थबाेध व्हावा म्हणून जिवाशिवाच्या मीलनाचे वर्णन करताना संतांनी लाैकिक शृंगाराचा आश्रय घेतला आहे.
कबीर म्हणतातप्रेमभ्नित हिंडाेलना जहाँ झुलै आत्माराम हरिरस पिया जानिये, ज्याे कबहू जाय न कुमार आता तुझ्या पत्रातील पुढच्या मुद्याकडे वळू.अर्जुन रथात बसला आहे. त्याच्या रथावर मारुती आहे व त्याचा सारथी कृष्ण आहे.ज्ञानेश्वर म्हणतातजेथ अश्ववाहकु आपण। वैकुंठाचा राणा जाण। तया रथाचे गुण। काय वर्णु।। ध्वजस्तंभावरी वानरू। ताे मूर्तिमंत शंकरू। सारथी शारंगधरु अर्जुनिसी।। देखा नवल तया प्रभुचे। अद्भुत प्रेम भ्नताचे। जे सारथ्य पार्थाचे। करित असे।