जाेवर जग सत्य म्हणून अनुभवाला येत असतं ताेवर परमात्मा सत्य म्हणून अनुभवाला येऊ शकत नाही.या जगात दाेन सत्य असण्याची श्नयता नाहीये.यात एकीकडून सत्य तुटलं तरच दुसऱ्या बाजूनं सत्याचा बाेध हाेईल. डाेळे बंद करा, असं आपल्याला सांगणं श्नय झालं असतं.पण, डाेळे बंद करण्यानं जग स्वप्नासारखं जाणवणार नाही.उलट डाेळे बंद झाले तर भीती याची आहे, की आपण आतल्या आत अशी स्वप्नं पाहू लागाल जी सत्य वाटावीत. डाेळे पूर्ण बंदच असले तर आपण दिवास्वप्नात जाल अशी भीती आहे... नासाग्र दृष्टीने श्नतीचे ऊर्ध्वगमन हाेते.