चाणक्यनीती

    20-May-2023
Total Views |
 
 

Chanakya 
 
नदी, तलाव, विहीर इ. ठिकाणी पडलेल्या पावसाच्या पाण्याने ते भरतात.त्या पावसाचे सार्थक हाेते. जीवसृष्टी वर्षभर या पावसावरच अवलंबून असते.समुद्राचे खारे पाणी ‘पेयजलही’ नसते.
 
2. पाेट भरलेली व्यक्ती जेवून तृप्तीचा ढेकर दिलेल्या व्यक्तीला पंचपक्वान्नाचे ताट जरी समाेर वाढून ठेवले तरी त्याचे महत्त्व नसते.
कारण त्याचे पाेट भरलेले असते.मात्र, भुकेल्याला अन्न दिले तर त्याला त्याची किंमत असते व देणाऱ्यालाही त्याचे समाधान.
 
3. दान : दान नेहमी सत्पात्री असावे. गरजवंताला, निर्धन व्यक्तीला धन दिले तर त्याला त्याचा उपयाेग तरी हाेईल; पण ‘ज्यांच्या घरी, धनाच्या राशी’ त्याला त्याचे काय महत्त्व?
 
4. दिवा : रात्री किंवा काळाेखात दिवा उजेड देताे.सगळे स्पष्ट दिसू लागते; परंतु दिवसाउजेडी सूर्यनारायणाची कृपा सर्व विश्वावर असताना दिवा काय उजेड देणार? दिव्याची वात, तेल, दिवा लावणे सर्व व्यर्थच.
 
बाेध : काेणतीही गाेष्ट काळ, वेळ, व्यक्ती, ठिकाण यासाठी उपयुक्त नसेल तर ती गाेष्ट, ते कार्य निष्फळ किंवा मूर्खपणाचे ठरते.