जळाे त्याचें ज्यालें पण । न देखेचि समचरण ।।1।।

    02-May-2023
Total Views |
 
 

saint 
पंढरीचा पांडुरंग हा केवळ समचरणी उभा नाही, तर त्याचे वर्तन आणि संदेशही समत्त्वाचा आहे. डाेक्या खांद्यावर, हातावर, हातात, काखेत आदी ठिकाणी त्यांनी चाेखा, नामा, ज्ञाना, मुक्ताई, जनाई, गाेरा या सर्व संतांना स्थान दिले आहे. विठाेबाच्या या वर्तनातून म्हणजेच कृतीतून संपूर्ण मानव जातीला समतेचा संदेश मिळताे. कर्तव्य हाच मानवतेचा खरा आधारस्तंभ असल्याने हा विठ्ठल कष्टकऱ्यांच्याच मदतीला जाताे. केवळ त्याचे नाम घेतले म्हणजे झाले, असे याच्या बाबतीत हाेत नाही. कर्तव्य हीच पूजा मानणाऱ्यांच्या सेवेत हा पांडुरंग तत्पर असताे.
 
म्हणूनच त्याने चाेखाबासाेबत ढाेरे ओढली,सजन कसायासाेबत मांस विकले, राेहिदासासाेबत चर्म रंगले, सावतासाेबत खुरपले, नाथा घरी पाणी भरले. यावरून समचरणी उभा असलेला पांडुरंग कष्टकऱ्यांचा साथी असल्याचे दिसून येते. स्वत:च्या वर्तनातून समत्व जाेपासणाऱ्या, लहान माेठा किंवा इतर प्रकारचा भेद न करता व कसल्याही प्रकारची अपेक्षा न करता निःस्वार्थ भावाने प्रेमाची देवाण-घेवाण करणाऱ्या आणि कर्तव्य करणाऱ्यांना साथ देणाऱ्या या पांडुरंगाचे एकदातरी दर्शन व्हायला हवे. जय जय राम कृष्ण हरी -डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448