ओशाे - गीता-दर्शन

    02-May-2023
Total Views |
 
 

Osho 
 
ते तुम्हालाही हेच सांगताहेत,की तुम्ही डाेळे उघडा आणि तुम्ही बगीच्यात असल्याचं तुम्हाला दिसेल.कित्येकदा असं हाेतं की आधीच्या जन्मामध्ये कुणी साधक बरीच यात्रा करून टाकताे. त्याची यात्रा अगदी परिप्नव हाेऊन जाते. जणू नव्व्याण्णव अंशावर पाणी असावं खळखळतं, पण अजून पाणी वाफ झालेलं नाहीये, आता फ्नत एकच अंश उष्णता मिळायची राहिली आहे. मागच्या जन्मातून ताे नव्व्याण्णव अंशाचीच साधना घेऊन आला आहे. आता या जन्मात एखादी छाेटीशी घटना घडावी, की ज्यायाेगे ती एक अंश उष्णता पुरी व्हावी की लगेच वाफ बनू लागेल. आणि तुम्ही जर त्याला विचारलं मग मी कसं गरम हाेऊ?’ आणि जर त्यानं म्हटलं, ‘ असं काही खास करायची गरज नाही,’ जरा इकडे येऊन उन्हात उभं राहिलं तरी वाफ हाेऊन जाल. आणि आपण तर घट्ट दगडासारखे गाेठलेले बर्फ आहात. उन्हात उभं राहिल्यानं काहीएक परिणाम आपणावर हाेणार नाही. आणि बर्फ तरी आकुंचित हाेता, एका ठिकाणी मर्यादित हाेता, एका जागी सीमित हाेता.आता वितळल्यावर ताे पाणी हाेईल जास्त जागा व्यापेल, पसरेल आणि मग अडचण हाेईल.