पत्र चाैदावे तू गीतेची काया-वाचा-मने सेवा कर म्हणजे स्वानंदसाम्राज्याचे सिंहासन तुला मिळेल. ही गीता म्हणजे सर्व धर्माचे माहेर, सज्जनांचे जिव्हार व परमार्थांचे लावण्य रत्नभांडार आहे. गीता म्हणजे ग्रंथांचा मेरूमणी व परमार्थांचा शिराेमणी.ज्ञानेश्वरांच्या भाषेत बाेलायचे म्हणजेएथ चातुर्य शहाणे झाले। प्रमेय रुचीस आले। आणि साैभाग्य पाेखले। सुखाचे एथ।। असाे! बाकीचा मजकूर पुढील पत्रात.तुझा राम पत्र पंधरावे प्रिय जानकी, तुझे पत्र पावले. काही लाेक परमार्थांच्या प्रांतात स्त्रियांना समान ह्नक देण्याच्या विरुद्ध आहेत हे पाहून तुला राग येणे साहजिकच आहे. पणगीता वाचून तुला कळून येईल की, परमार्थांच्या प्रांतात स्त्रियांना कमीपणा देण्याचे कारण नाही. तुला एक मजेशीर गाेष्ट सांगताे.
स्वामी विवेकानंद युराेपच्या दाैऱ्यावर हाेते. त्यांच्या परमार्थपर भाषणांनी लाेक माेहून गेले हाेते. एका व्याख्यानात ते म्हणाले- ‘‘आम्ही भारतीय लाेक स्त्रियांना पुरुषांच्या बराेबरीचे समजत नाही.’’ हे वा्नय ऐकताच श्राेत्यांमधून ‘शेम शेम’ च्या आराेळ्या उठल्या.क्षणभर थांबून विवेकानंद म्हणाले-‘‘आम्ही भारतीय लाेक स्त्रियांना पुरुषांपेक्षा श्रेष्ठ व वंद्य समजताे.’’ ‘शेम शेम’ म्हणून ओरडणाऱ्या लाेकांचा चेहरा फाेटाे काढण्यासारखा झाला.तू सिद्धी व प्रसिद्धीबद्दल विचारले आहेस.हे खरे आहे की, परमार्थात माणसाला सिद्धिची हाव असते व व्यवहारात माणसाला प्रसिद्धीची हाव असते.पण तू लक्षात घे कीजाे सिद्धीच्या मागे लागला ताे देवदर्शनाला मुकला व जाे प्रसिद्धीच्या मागे लागला ताे खऱ्या सुखाला मुकला.परमार्थात वाटचाल करत असताना माणसाला सिद्धी मिळते पण माणसाने सिद्धीच्या मागे लागू नये.
चांगले काम केल्यानंतर माणसाला प्रसिद्धी मिळते पण जाे प्रसिद्धीच्या मागे लागला त्याचा कार्यभाग बुडाला.तू आपल्या डायरीत लिहून ठेव.जाे न मागे कीर्ती ती त्याची करी आरती.तू विचारतेसपरमार्थात श्रद्धेला किती किंमत आहे? श्रद्धेला फार किंमत आहे, पण श्रद्धा अंधश्रद्धा असता कामा नये. श्रद्धारूपी दुधात बुद्धिरूपी साखर घालावी म्हणजे श्रद्धेला गाेडी येते. श्रद्धारूपी दुधात बुद्धिहीनतेचे मीठ घातले तर श्रद्धेची गाेडी जाते व ती नासते.तू परमानंदाबद्दल विचारले आहेस.आपल्या अंत:करणात देव आहे. त्या देवाचा शाेध व बाेध हाच परमार्थातील परमानंद. त्या देवीच्या प्रसादाने नुसतीच शांति मिळत नाही तर पराशांती प्राप्त हाेते. शांतीसारखे या जगात सुख नाही, पराशांती हेच परम सुख.