नाकाचा फ्नत अग्रभागच पाहायचा असेल, तर डाेळे पूर्ण उघडे ठेवायची गरज राहणार नाही. डाेळेही अर्धाेन्मीलित असेच उघडे राहतील. आपण जर बसलेले असाल तर फार झालं तर दाेन फुटांपर्यंतची जमीन दिसू शकेल, उभे असाल तर चार फूट. तीसुद्धा जमीन म्हणून ओळखता येण्यासारखी नीट दिसणार नाही, पुसट-पुसट, अस्पष्ट अशीच दिसेल... दाेन कारणं आहेत. जर दृष्टी बराच वेळ अशी नासाग्रावर ठेवली तर सगळं जग आपल्याभाेवती पसरलेलं हे जग वास्तव कमी, अन् स्वप्नासारखं जास्त असं अनुभवाला येईल. अन् याचा खूपच उपयाेग आहे... आपण अशा प्रकारे अर्धाेन्मीलित नेत्रांनी नासिकाग्राकडे पहाल तर हे अवतीभाेवतीचं जग, जे आपणाला फार भरीव अन् खरंखुरं वाटतंय ते केवळ स्वप्नासारखं दिसू लागेल.
हे जगत् जे आपणाला भरीव, खरंखुरं अशाप्रकारचं आपल्या अनुभवाला येतंय त्याच्यामागे, त्याच्याकडे पाहण्याची शैली हेच कारण आहे. म्हणून ज्याला ध्यानात जायचं आहे त्याला जग खरंखुरं नाही असं अनुभवाला आलं, तर अंतर्यात्रा साेपी हाेईल. जग अंधुक अन् स्वप्नभूमी आहे असं अनुभवाला आलं, तर अंतर्यात्रा साेपी हाेईल. जग अंधुक अन् स्वप्नभूमी आहे असं अनुभवाला येईल.बघा कधी असं बसून, फ्नत नासाग्र दृष्टी ठेवून तर बाहेरच्या सगळ्या वस्तू हळूहळू अंधुक हाेऊन स्वप्नांसारख्या हाेऊन जातात. त्याचं भरीवपण कमी हाेत जातं, त्यांची वास्तविकता क्षीण हाेत जाते, त्यांचं यथार्थपण हरवून जाईल अन् जणू एक माेठं स्वप्न सगळीकडे चालू असल्यासारखं वाटेल, हे एक बाह्य कारण आहे; पण फार माेलाचं आहे. कारण जग स्वप्न म्हणून अनुभवाला आलं, तरच परमात्मा सत्य म्हणून अनुभवाला येऊ शकताे.