राजस, तामस यज्ञांचे वर्णन केल्यावर ज्ञानेश्वर सात्त्विक यज्ञाचे वर्णन आणखी पुढे करतात.शास्त्रविधीला साेडून मंत्रहीन, श्रद्धारहित असा तामस यज्ञ असताे.पण देव, ब्राह्मण, आईबाप, गुरू यांचे पूजन, शुद्धता, सरळपणा हे सात्त्विक तप हाेय. उलट तमाेगुणी माणसाचा आचार स्वैर असताे.ब्राह्मणांचा ताे द्वेष करताे. वावटळीला ज्याप्रमाणे अग्नीचे सहाय्य मिळावे, निपुत्रिकाचे घर लुटले जावे.त्याप्रमाणे त्याचा तामस यज्ञ व्यर्थ असताे. तपाचेही तीन प्रकार आहेत. शारीरिक, मानसिक व वाचिक असे तपाचे तीन प्रकार आहेत. यापैकी शारीरिक तपाचे वर्णन करताना ज्ञानेश्वर म्हणतात की, प्रिय देवतेच्या दर्शनासाठी हा मनुष्य सतत िफरत असताे. देवाचे अंगण झाडून,सारवून, रांगाेळी घालून ताे सुशाेभित करताे. त्याच्या पूजेची सर्व तयारी करताे.
देवाची प्रतिमा पाहिली की ताे काठीप्रमाणे शरीर पाडताे म्हणजे साष्टांग नमस्कार घालताे.ताे ब्राह्मणांची चांगली सेवा करताे. प्रवासाने, संकटाने जे पीडलेले असतात. त्यांना ताे सुख देताे. सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ असलेले जे आईबाप त्यांच्या सेवेसाठी ताे स्वत:चे शरीर खराेखर ओवाळून टाकताे.ज्ञानवान व दयावान गुरूला ताे भजताे. स्वधर्माचरण करून, देहाचा अहंकार ताे साेडून देताे. भूतमात्रांमध्ये ब्रह्मतत्त्व जाणून ताे त्यांना नमस्कार करीत असताे.पराेपकार करण्यात ताे तत्पर असताे. स्त्रीविषयी त्याचा मनाेनिग्रह असा असताे की, फक्त जन्माच्या प्रसंगीच स्त्रीदेहाचा त्याला स्पर्श झालेला असताे. गवताच्या काडीसही ताे धक्का लावीत नाही. ताे ताेडमाेड करीत नाही. असे हे शारीरिक तप आहे.