गीतेच्या गाभाऱ्यात

    19-May-2023
Total Views |
 
 
पत्र सतरावे
 

Bhagvatgita 
 
(1) प्रतिविंध्य - द्राैपदीला धर्मराजापासून झालेला.
(2) श्रुतसाेम - द्राैपदीला भीमापासून झालेला.
(3) श्रुतकीर्ती - द्राैपदीला अर्जुनापासून झालेला.
(4) शतानिक - द्राैपदीला नकुलापासून झालेला.
(5) श्रुतकर्मा - द्राैपदीला सहदेवापासून झालेला.
 
गीतेच्या पहिल्या अध्यायात काैरवांच्या सैन्यातील दुर्याेधनाने फ्नत सात जणांची नावे घेतली आहेत ती अशी-
(1) द्राेणाचार्य (2) भीष्माचार्य (3) कर्ण (4) कृपाचार्य (5) अश्वत्थामा (6) विकर्ण (7) भूरिश्रवा.
 
पांडवांचे सैन्य फ्नत सात अक्षाैहिणी हाेतं, तर काैरवांचे सैन्य अकरा अक्षाैहिणी हाेतं.दुर्याेधनाने नावे घेताना पहिल्या अध्यायात पांडवांच्या सैन्यातील अठरा जणांची नावे घेतली, पण आपल्या सैन्यातील फ्नत सात जणांची नावे घेतली.एक अक्षाैहिणी सैन्य म्हणजे 21870 हत्ती, 21870 रथ, 65610 घाेडे, 109350 पायदळ.दाेन्ही सैन्यात मिळून सुमारे चाळीस लाख वीर हाेते.वात्स्यायनाने म्हटले आहेआषाेडशात् सप्ततिवर्षपर्यंन्तं याैवनम्। साेळा ते सत्तर वर्षांपर्यंत तारुण्य.भीष्माचार्य, द्राेणाचार्य असे काही अपवाद साेडले तर काैरव पांडवांच्या सैन्यात सारे तरुण वीर हाेते. सुमारे चाळीस लाख तरुण वीर युद्धात मारले गेले तर किती हाहा:कार हाेईल, ह्या विचाराने अर्जुन बेचैन झाला हाेता.
 
ताे काही शांती सैनिक नव्हता. हिंसा ह्या प्रश्नाने त्याचे मन ग्रासले नव्हते. असले युद्ध करण्यामुळे मला पाप लागेल का? ह्या प्रश्नाने ताे व्याकुळ झाला हाेता.ताे म्हणताेअहाे बत महत्पापं कर्तु व्यवसिता वयम्। यद्राज्यसुखलाभेन हन्तुं स्वजनमुद्यता:।। काय पहा! राज्यसुख लाेभामुळे स्वजनांना ठार मारण्यास उद्यु्नत झालाे हे खराेखरच माेठे पाप करण्याचे आम्ही याेजले आहे! गीतेत कृष्णाने जीवनाला उपयाेगी पडणारे महान तत्त्वज्ञान सांगितले व न्याय प्रस्थापित करण्याकरता कर्तव्यकर्म म्हणून युद्ध करण्याचा प्रसंग आला तर त्या युद्धामुळे आपणाला पाप लागत नाही त्याबद्दल अर्जुनाची खात्री केली.अर्जुनाला आरंभी विषाद झाला हे ठीक आहे. पण दु:खानंतर त्याने कर्तव्य करणे जरूर हाेते. कृष्ण त्या ठिकाणी नसता तर अर्जुन कर्तव्यपराड्मुख झाला असता.
 
सीतेला रावणाने पळवून नेल्यानंतर राम खूप रडला.निरनिराळ्या झाडांना मिठी मारून रडला. एका वेलीपाशी त्याने खूप अश्रू ढाळले व ताे त्या वेलीला म्हणालातुला फुले येतील आणि मग ज्यावेळी सीता तेथे येईल त्यावेळी तिला सांग :- ‘‘ही रामाच्या अश्रुची फुले आहेत.’’ रामाने असा शाेक करणे साहजिक आहे, पण राम नुसताच शाेक करत बसला असता तर रामाला काेणी राम म्हटले नसते.
शाेक करणाऱ्या रामातले रामपण अशात आहे की, त्याने नंतर कर्तव्यकर्म केले व रावणाला ठार मारून सीतेची सुटका केली.याच्या उलट तू हॅम्लेटचे उदाहरण पहा. त्याच्या चुलत्याने त्याच्या बापाला ठार मारून सिंहासन बळकावले व त्याच्या आईशी म्हाेतुर लावून ताे राज्य करू लागला.