गीतेच्या गाभाऱ्यात

    18-May-2023
Total Views |
 
 
 
Bhagvatgita
पत्र साेळावे वृद्ध लाेक आपला पूर्वीचा पराक्रम सांगण्यात मशगूल असतात. नवीन पिढीला त्यात रस वाटत नाही. पूर्वीचे प्रश्न इतिहासजमा झालेले असतात. वृद्ध लाेक नवीन प्रश्न समजून घेत नाहीत. तरुण पिढीला त्यांच्यापुढे येणाऱ्या प्रश्नाबद्दल उत्सुकता असते. पूर्वीच्या शिळाेप्याच्या गाेष्टी ऐकण्यात त्याना औत्सु्नय वाटत नाही. वृद्धांना वाटते आपली काेणी दखल घेत नाही. बदलत्या काळाशी आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची अक्षमता हेच वृद्धांचे वैगुण्य असते. वृद्ध लाेक फिरण्याचा वगैरे व्यायाम घेऊन शारीरिक आराेग्य राखण्याचा प्रयत्न करतात, पण मनाबाबत ते निष्काळजी राहतात. उलट बाहेरचा वारा आत येऊ नये म्हणून मनाच्या खिड्नया -कवाडे ते घट्ट लावून घेतात. ह्यामुळे सारा घाेटाळा हाेताे.
 
गीता वाचून तुला कळून येईल की, शरीर वृद्ध झाले तरी मन वृद्ध हाेऊ देता कामा नये.परिप्नवता हेच सर्वस्व असे शे्नस्पीअरने म्हटले आहे.पण परिप्नवता म्हणजे जुनाटपणा नव्हे. परिप्नवता म्हणजे रसरशीतपणा. निसर्गातही परिप्नवतेला महत्त्व आहे. कच्चे फळ आंबट तुरट असते, पण पिकलेले फळ मधुर असते.गीता सांगणारा कृष्ण वृद्ध हाेता. ताे वृद्धांना म्हणेलनव्या पिढीला समजावून घ्या नव्या जगाच्या उभारणीसाठी तुमच्या अनुभवाचा फायदा घेऊन प्रेमाने आपुलकीने नव्या पिढीला चार यु्नतीच्या गाेष्टी सांगा. त्यांच्या शंका निरसन करून याेग्य ताे उपदेश करून शेवटी म्हणा- यथेच्छसि तथा कुरू इच्छा असेल तसे करा.
 
तुम्ही असे कराल तर तुमच्याबद्दल तरुण पिढीला आदर वाटेल व जुन्या नव्याचा संघर्ष हाेणार नाही.असाे, बाकीचा मजकूर पुढील पत्रात तुझा राम * * * पत्र सतरावे प्रिय जानकी, तुझे पत्र पावले. पाैर्णिमेचं चांदणं पाहून जसा मनाला आल्हाद हाेताे, त्याप्रमाणे तुझ्या पत्रांतील प्रश्नांचं चांदणं पाहून मला आनंद झाला आहे.व्यासांना अठरा आकडा प्रिय आहे, हे तुझं म्हणणं खरं आहे.तुझ्यामाहितीकरता खालील गाेष्टी सांगता येतील.गीतेचे अध्याय अठरा आहेत.काैरव पांडवांचे सैन्य अठरा अक्षाैहिणी हाेते.काैरव पांडवांचे युद्ध अठरा दिवस चालले.
 
यज्ञात ऋत्विज अठरा असतात.गीतेच्या पहिल्याअध्यायात पांडवांच्या सैन्यातील महारथींची नावे दिली आहेत. हे महारथीदेखील अठरा आहेत.त्यांची नावे - (1) भीम (2) अर्जुन (3) सात्यकी (4) विराट (5) द्रुपद (6) धृष्टकेतु (7) चेकितान (8) काशिराज (9) कुंतिभाेज (10) शैब्य (11) युधामन्यु (12) उत्तमाैजा (13) अभिमन्यु व (14) ते (18) द्राैपदीचे पांच पुत्र.हे द्राैपदीचे पाच मुलगे काेण त्यांची नावे पुष्कळांना माहीत नाहीत. अर्जुनाला सुभद्रेपासून झालेला अभिमन्यु प्रसिद्ध आहे.द्राैपदीच्या पांच मुलांची नावे गीतेत दिलेली नाहीत. त्यांचा उल्लेख ‘द्राैपदेया:’ असा केला आहे.ते पाच मुलगे असे -