पत्र साेळावे
आजारी पडल्यावर नामस्मरणाचा भंपक प्रयाेग करण्यापेक्षा डाॅ्नटरांचे औषध घ्यावे. तुम्हाला काय वाटते?’’ या बाबतीत समन्वय हे उत्तर आहे. कृष्णाचे जीवन समजून घेऊन आपणास म्हणता येते की, प्रपंच व परमार्थ यांचा समन्वय करावा. त्याप्रमाणे या बाबतीत देखील समन्वय हे याेग्य उत्तर आहे. आजारी पडल्यानंतर डाॅ्नटरांचे जुळेल ते औषध घ्यावे व नामस्मरण करावे.प्रकृतीसुधारण्याकरता ज्याप्रमाणे औषधाचा उपयाेग हाेताे. त्याप्रमाणे नामस्मरणाचा देखील उपयाेग हाेताे.माझ्यापुढे प्रॅ्निटस करणारे एक वकील एकदा आजारी पडले. त्यांचे वर्षाला लाख रुपयांची प्रॅ्निटस आहे.त्यांनी नामांकित डाॅ्नटरांचे औषध घेतले पण गुण येईना.नंतर ते औषध घेऊ लागले व नामस्मरण करू लागले. त्यांना गुण आला.या बाबतीत मी बड्या बड्या डाॅ्नटरांच्याबराेबर चर्चा केली आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, प्रकृती सुधारण्याकरता ज्याप्रमाणे औषधाचा उपयाेग हाेताे त्याप्रमाणे नामस्मरणाचा देखील उपयाेग हाेताे.
तू लिहितेस- ‘‘काही लाेक राेज गीतेचा पंधरावा अध्याय म्हणतात किंवा वाचतात. मी सवडीप्रमाणे गीतेचा अभ्यास करत आहे.मी राेज गीतेचा काेणता अध्याय वाचू? माझ्या कल्याणाच्या दृष्टीने मला एक अध्याय सांगा म्हणजे ताे राेज मी वाचत जाईन व पाठ झाल्यावर राेज म्हणत जाईन.’’ या बाबतीत मी ध्यान करत असताना मला एक दिव्य विचार स्फुरला. ताे विचार असा की - पुरुषांनी गीतेचा राेज पंधरावा अध्याय वाचावा किंवा म्हणावा व बायकांनी राेज गीतेचा नववा अध्याय वाचावाकिंवा म्हणावा.हा विचार अशा काही वातावरणात स्फुरला की, मला वाटले हे कृष्णाचे बाेल आहेत.गीतेचा पंधरावा अध्याय महत्त्वाचा आहे यात वाद नाही.असे म्हणतात की, पुढचे तीन अध्याय परिशिष्टात्मक आहेत व पंधरावा अध्याय फार महत्त्वाचा आहे.गीतेचा पंधरावा अध्याय ज्याप्रमाणे महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे नववा अध्याय देखील महत्त्वाचा आहे.
पूर्वी अशी कल्पना हाेती की, बायकांना माेक्षाचा अधिकार नाही, कारण त्यांना वेदांचा अधिकार नाही (न श्रुतिगाेचरा।) पण या बाबतीत क्रांती करून गाेपालकृष्णानी नवव्या अध्यायात सांगितले की, बायकांना देखील माेक्षाचा अधिकार आहे.पूर्वीचे लाेक म्हणत असत की, बायकांनी चांगले काम केले म्हणजे पुढल्या जन्मी त्यांना पुरुषजन्म येईल व मग त्यांना वेदांचा अधिकार मिळेल व नंतर त्यांना माेक्षाचा अधिकार मिळेल.गाेपालकृष्णांनी क्रांती करून ही कल्पना नाहीशी केली व नवव्या अध्यायाम बायकांना माेक्षाचा अधिकार दिला.ज्ञानेश्वरांना नववा अध्याय फार महत्त्वाचा वाटत हाेता - इतका की, त्यांनी जिवंत समाधी घेताना नववा अध्याय मांडीवर ठेवून जिवंत समाधी घेतली.तू राेज नववा अध्याय वाचत जा किंवा म्हणत जा म्हणजे तुझे कल्याण हाेईल.तुला जर काेणी बायकांनी विचारले तर त्यांनाही राेज नववा अध्याय वाचण्यास किंवा म्हणण्यास सांग म्हणजे त्यांचे कल्याण हाेईल.तुझ्या पत्रातील शेवटचा प्रश्न नितान्त महत्त्वाचा आहे.जुन्या नव्याच्या संघर्षाबद्दलचा हा प्रश्न आहे.