जवळपास प्रत्येकाला सर्व सत्य समजतेच असे नाही. अर्थात कांही अंशी का हाेईना एखादया सत्यापासून माणूस दूर राहताेच.हे सत्य असले तरी अनेक लाेक असे असतात की ते स्वत:ला सर्व प्रकारचे सत्य समजतेच असे समजून वागतात. यांच्याकडून असत्याचा मार्ग अवलंबिला गेला तरी हे लाेक असत्यालाही सत्यच समजतात. आपण जे करताे तेच खरे व सत्य आहे, असे मानणाऱ्याला खऱ्या सत्याची आठवण करून देणे खरेच अवघड असते. संसारात अडकलेल्या जीवाच्या बाबतीत असेच घडते. हा जीव त्याला जे याेग्य वाटते त्यालाच सत्य मानताे.संसार सुखावह व्हावा, मनिषा पूर्ण व्हाव्यात, इंद्रियांचलळे पुरवले जावेत म्हणून हा जीव जाे जे करताे, ते त्याच्या दृष्टीने याेग्य असल्याचे त्याचे मत असते.
प्रत्येकजण जे करताे तेच सत्य, तेच खरे तेच याेग्य असते तर समाजात अनिष्ट घटना घडल्या नसत्या. पण प्रत्यक्षात समाजात अनिष्ट घटना ह्या घडत असतात. याला मानवाचा स्वभाव, चुकीची विचारवृत्ती, अयाेग्याला याेग्य मानण्याची प्रवृत्ती कारणीभूत असते. अशी प्रवृत्ती काेणासीठीही चांगली नसते,त्यामुळे आपण स्वत:हून अशा प्रवृत्तीचा त्याग करणे याेग्य असते.
जय जय राम कृष्ण हरी। - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448