पत्र साेळावे तरी झडझडाेनि वहिला निघ । इये भ्नतीचिये वाटे लाग । जिया पावसी अव्यंग । निजधाम माझे ।। गीता वाचून आपण जाे खटाटाेप करावयाचा ती अंतरंगातील देव जाेडण्याचा. तुकाराम महाराज म्हणतात - देव जाेडे तरी करावा अधर्म । नातुडे ताे धर्म नाचरावा ।। तू लिहितेस - ‘‘काजवा केवढासा लहान प्राणी! पण देवाने त्याला प्रकाश दिला आहे पण मनुष्य सर्वांत महान प्राणी असताना त्याला देवाने का प्रकाश दिला नाही?’’ तुझ्याप्रमाणे पुष्कळाना अशीच शंका आहे. असे पहा की - काजव्याला फ्नत बाहेरचा प्रकाश आहे पण मनुष्याच्या अंतरंगात जाे दिव्य प्रकाश आहे ताे काजव्याच्या प्रकाशापेक्षा लाखाेपटीने श्रेष्ठ आहे. म्हणूनच सर्व प्राणिमात्रात मनुष्य महान प्राणी आहे.
तू विचारते कीपरमार्थ व तत्त्वज्ञान यांचा काय संबंध आहे?’’ त्याचे उत्तर असे कीपरमार्थाच्या शेतात भ्रामक समजुतीची जनावरे माेकाट सुटू नयेत म्हणून घातलेले कुंपन म्हणजे तत्त्वज्ञान.तू लिहितेस- ‘‘गीतेबद्दल बाेलताना अंतरंगातील देवाचा साक्षात्कार करून घ्यावयाचा यावर तुम्ही फार जाेर देता. तुमचा हा विचार फार चांगला आहे. मला अशी शंका आहे की, साक्षात्काराच्या बाबतीत शास्त्रीय पद्धती आहे का नुसता भ्रामकपणा आहे?’’ प्रश्न ठीक आहे? आधिभाैतिक शास्त्रात शास्त्रीय पद्धती अशी असते की, एखादी कल्पना गृहीतकृत्य म्हणून स्वीकारली जाते व त्याप्रमाणे प्रयाेग करण्यात येऊन ती कल्पना खरी ठरली तर तिला सिद्धांताचे स्वरूप देण्यात येते.साक्षात्कारात अशीच शास्त्रीय पद्धती आहे. गीता वाचून आपण प्रयाेग करणेचे असतात व अनुभवाने खरेपणा प्रत्ययास आला तरच आपण सिद्धांत मानायला तयार हाेणेचे असते.गीतेच्या बाबतीत तू अनुभवाला जास्तीत जास्त किंमत दे.
भ्रामकपणाला थाेडा देखील थारा न देता, अंतरंगातील देव जाणून घेण्याचा तू प्रयत्न कर. असा एक साेन्याचा दिवस उगवेल की, त्या दिवशी तुला अंतरंगातील देवाचा साक्षात्कार हाेईल व तुझ्या जीवनाचे सार्थक हाेईल.तू विचारतेस- ‘‘अंतरंगातील देवाचा साक्षात्कार झाल्यावर भूतभविष्य कळू लागते अशी एक कल्पना आहे, त्यात कितपत तथ्य आहे?’’ याचे उत्तर असे की, अंतरंगातील देवाचा साक्षात्कार झाल्यावर भूतभविष्य कळू लागते हे म्हणणे बराेबर नाही.अंतरंगातील देवाचा साक्षात्कार झाल्यावर पराकाष्ठेचा आनंद हाेताे व हेच भाग्याचे लक्षण आहे. भूतभविष्य कळू येणे हे भाग्यहीनाचे लक्षण आहे. तुकाराम महाराज म्हणतात.भूतभविष्य कळाे यावे वर्तमान। हे ताे भाग्यहीन त्यांची जाेडी।। आम्ही विष्णुदासी देव घ्यावा चित्ते। हाेणार ते हाेते प्रारब्धे।। तू विचारतेस- ‘‘काही लाेक म्हणतात आजारी पडल्यावर अजिबात औषध घेऊ नये. फ्नत नामस्मरण करावे. दुसरे काही लाेक म्हणतात -