म्हणाेनी ते समाधान। बाेलताच न ये ऐसें जाण ।।

    15-May-2023
Total Views |
 
 
 

saint 
 
हा संपूर्ण ‘अनुर्वाच्य’ समास गहन अर्थाने भरलेला आहे. एखाद्या जलाशयाचा तळ गाठण्यासाठी खाेल बुडी मारावी लागते तसे हा समास समजून घेण्यासाठी चित्त एकाग्र करून अंतर्मनात धाव घ्यावी लागते. धान्य आणि भुसामध्ये भूंस उडवून धान्याचा कण द्यावा त्याप्रमाणे शब्दांची ाेलपटे टाकून त्यातील लक्ष्यार्थ स्वानुभवाच्या कसाेटीनेच घेतला पाहिजे. पण या उपमेतही पूर्ण साधर्म्य नाही. कारण भूंस आणि दाणा एकदमच तयार हाेताे आणि दाेन्हीही ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने जाणता येतात. मात्र शब्दांनी प्रगट हाेणारा अर्थ शब्द येण्यापूर्वीच अस्तित्वात असताे आणि शब्द संपले तरी शिल्लक राहताेच.शिवाय बाेललेला किंवा लिहिलेला शब्द ध्वनी किंवा अक्षररूपात असल्याने ज्ञानेंद्रियांना दृश्य असताे; परंतु अथमात्र ज्ञानेंद्रियांच्या पैलतीरी आणि अदृश्य व अविनाशी असताे.
 
हा अर्थ ज्याला श्रीसमर्थ लक्ष्यांश म्हणतात ताेही सत्य अनुभवाच्या दाेन पावले अलीकडेच थांबलेला असताे. परमसत्य अनुभव ‘अलक्ष’ असताे.हे जाणावयाचे झाले तर आणखी खाेल पाण्यात उतरावे लागणार आहे. ज्ञानग्रहणाच्या जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या या मार्गाने प्राप्त हाेणारी ‘तुर्यावस्था’ ही त्या चारीतील सर्वप्रगत अवस्था हाेय.समुद्राच्या वाळवंटात आपण पाहिले तर लाटा आणि वाळू यांच्यामध्ये एक सीमारेषा दिसते. लाटा तेथपर्यंत येतात आणि परत जातात. त्या रेषेच्या अलीकडे वाळू आणि पलीकडे समुद्र असताे. परमार्थ मार्गातील ‘तुर्यावस्था’ म्हणजे ऐल प्रपंच आणि पैल परमार्थ ही वरील रेषेप्रमाणे हाेय.