म्हणूनच तर रेशमी कपडे पूर्वीपासून वापरण्यात आले.त्यांच्यावर प्रभाव पडत नाही. यामुळे आपणाभेवती एक निष्प्रभावी धारा बनते...वस्त्र स्वच्छतम असावीत, काेमल असावीत, रेशमी असावीत.आणि मग ज्या काही जणांना आढळून आलं की, काेणतेही कपडे वापरा काही ना काही अडचण आहेच... तेव्हा महावीरांनी दिगंबर बनून प्रयत्न केला. महावीर नग्न झाले त्याची कारणं हाेती. ते असे उगाचच नग्न झाले नव्हते. त्यांचं डाेकं काही बिघडलेलं नव्हतं.कसल्याही कपड्यांचा वापर करा, काही ना काही प्रभावाचं संक्रमण हाेतंच. आपले ध्यानाचे कपडे अलग ठेवायचे झाले तर ते आपणच ठेवणार ना? आपणच उचलणार ना? आपणच कुठंतरी ठेवणार ना? अन् आपल्या घरात एखादीही जागा नाहीये की जी आपण सर्व प्रभावापासून मु्नत ठेवू शकू.
जर आपण आपल्या घरातील एक काेपरा सर्व प्रभावापासून मु्नत ठेवू शकलात तर ताे मंदिर हाेऊन जाताे. मंदिर याचा अर्थ एवढाच आहे. गावात एक घर आपण असं राखू शकलात की, जे सर्व प्रभावापासून मु्नत असेल, तर ते मंदिर हाेऊन जातं. मंदिर याचा अर्थ इतकाच आहे... पण या क्षणी काहीही वेगळे ठेवणे फार अवघड आहे.म्हणूनच एक काेपरा.. शुद्ध स्थान असं म्हटलं आहे. शुद्ध स्थान म्हणजे अप्रभावित स्थान असं ठिकाण, जे जीवनाच्या निम्नतर वासनांपासून अगदी अप्रभावित आहे आणि अशा अप्रभावित स्थानांचा परिणाम खाेलवर घडत असताे आणि एखाद्या नवकाेट नारायणाच्या घरी जर अशा प्रकारचा शुद्ध काेपरा नसेल, तर ते घर फार गरीब आहे.