ओशाे - गीता-दर्शन

    12-May-2023
Total Views |
 
 

Osho 
 
पण केमिकल अ ॅ न ा ि ल ि स स द्व ा र े , रासायनिक पृथ्नकरण- विश्लेषणाद्वारे आपणास जे कळू शकतं ते गरीब लुकमान खूप वर्षापूर्वीच आपल्या पुस्तकात लिहून चुकला, सुश्रुताने आपल्या पुस्तकात लिहून ठेवलं आहे, धन्वंतरीने सांगून ठेवलंय. त्यांच्या काही प्रयाेगशाळा नव्हत्या. प्रयाेगशाळांची पद्धती तेव्हा नव्हती, जाणण्यासाठी त्यांच्याजवळ निश्चितपणे काही वेगळा विधी, काही वेगळी मेथड हाेती. हा वेगळा उपाय, वेगळा मार्ग ध्यानाचा हाेता.गहन ध्यानाच्या क्षणी, आपण कुठल्याही वस्तूबराेबर तादात्म्य प्रस्थापित करू शकता.मानसशास्त्रज्ञांनी यासाठी एक विशिष्ट नाव देऊन ठेवलं आहे. पार्टिसिपेशन मिस्टिक. एका अगदी रहस्यमय शैलीने आपण कुणासमवेत एकात्म हाेऊन जाता.
 
ध्यानाच्या वेळी, गहन शांतीच्या आणि माैनाच्या क्षणी जर आपण गुलाबाचं फूल समाेर ठेवलं आणि त्याच्याशी इतके एकरूप झालात की त्या गुलाबाला आपण विचारू शकावं की बाेल. तुझा उपयाेग काय आहे? तर गुलाब बाेलणार नाही, पण आपले प्राणच सांगतील, आपल्या तुमच्या अंतः प्रेरणेतूनच उत्तर येईल की, ‘माझा हा उपयाेग आहे’ या कामात जाे काेणी अनंत प्रकारच्या वनस्पतींमधून, ध्यानास याेग्य वातावरण निर्माण करेल अशी वनस्पती धुंडून आणील, त्याला कुशल म्हणत असत.म्हणून कृष्णानं सांगितलं, ‘सगळ्या आधी कुश.’वस्त्र, विशेष वस्त्र. सगळीच वस्त्रे मदतरूप ठरत नाहीत.आपण जी वस्त्रे वापरून भाेजन केलं. त्याच वस्त्रात ध्यान करणं अवघड जाईल