3. जितेंद्रिय - माणूस ‘वाघावर’ स्वार हाेऊ शकताे; पण ‘रागावर’ नाही. कारण इंद्रियांवर ताबा मिळविणे महाकठीण असते.
एखाद्या महायाेग्यालाच ते जमते. स्वामी विवेकानंद अमेरिकेतील सुंदर ललना पाहूनही भुलले नाहीत. समर्थ रामदास स्वामी लग्नाच्या वेळी ‘सावधान’ शब्द ऐकून त्यांच्या साैभाग्यकांक्षिणीला ‘माळ घालण्यास’ सावधान न हाेता विश्वाची चिंता करण्यासाठी सावधान हाेऊन स्त्रीमाेह साेडून दूर निघून गेले. नेत्र, कर्णेद्रिय, स्पर्शेद्रिय, रसना, नासिका इत्यादींमुळे मिळणारे सुख, त्याहीपेक्षा स्त्रीसुख साेडणे कठीण; परंतु वैरागी जितेंद्रियाला ते तुच्छ असते.