गीतेच्या गाभाऱ्यात

    12-May-2023
Total Views |
 
 
पत्र साेळावे
 

Bhagvatgita 
 
तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून रामभाऊंनी जे काम केले त्याबद्दल सार्थत्वाने असे म्हणता येईल की, प्रिं. आगरकर व प्रिं. भाटे यांनी त्यांच्यापूर्वी रूढ केलेल्या प्रत्यक्षवाद व अज्ञेयवाद या दाेन विचारसरणीच्या परंपरेला आदर्शवाद व साक्षात्कारवाद यांची जाेड देण्याचे काम रामभाऊंनी केले. काॅलेजातील त्यांची व्याख्याने अंत:स्फूर्तीने भरलेली व एखाद्या प्रेषिताचे बाेल असलेली असत.तू असे लक्षात घे की, 1909 साली रामभाऊंना भयंकर आजार झाला व डाॅ्नटरांनी ‘मेंदूचा क्षय’ असे निदान केले व या दुखण्यातून ते फार दिवस जगत नाहीत, असे स्पष्टपणे सांगितले. डाॅ्नटरांचा अंदाज खाेटा ठरला. नामस्मरण हे औषध रामभाऊंना लागू पडले. रामभाऊंना टी.बी हाेता, त्यांची प्रकृती वाईट हाेती. पण ते 71 वर्षे जगले व त्यांनी प्रचंड कार्य केले, याचं कारण नामस्मरण.
 
आपत्तीचे डाेंगर काेसळल्यानंतर ज्याप्रमाणे तुकारामांनी देवाची कास धरली त्याप्रमाणे व्याधीनी जर्जर झालेले रामभाऊ कमालीची परमार्थ साधना करू लागले.खूप वाचन, मनन व अनुभव या जाेरावर रामभाऊंनी 1926 साली A Constructive Survey of Upanishadic philosophy ग्रंथ प्रसिद्ध केला. औपनिषदिक तत्त्वज्ञानाचे समालाेचन करणाऱ्या या ग्रंथाने रामभाऊंना जागतिक कीर्ती मिळवून दिली.नंतर गंगानाथ झा यांच्या आग्रहावरून रामभाऊ ता.1 डिसेंबर 1927 राेजी अलाहाबाद विद्यापीठात तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून कामावर रूजू झाले. 1949 मध्ये सेवानिवृत्त हाेताना त्यांच्या अंगावर कुलगुरुपदाचे भूषण शाेभत हाेते. 1947 साली अलाहाबाद विद्यापीठाने डी.लिट ही अत्युच्च पदवी देऊन त्यांचा गाैरव केलतू असे लक्षात घे की, खूप मान मिळाला पण टिळक जसे लाेकमान्य या नावाने अमर झाले त्याप्रमाणे रामभाऊंना खूप पदव्या मिळाल्या पण ‘गुरुदेव’ या नावाने अमर झाले.
 
अलाहाबाद विद्यापीठातून सेवानिवृत्त झाल्यावर रामभाऊंनी सांगलीच्या राजेसाहेबांच्या साहाय्याने ‘अध्यात्म विद्यामंदिर’ या नावाची संस्था ता. 26/10/1947 राेजी स्थापन केली.या संस्थेमार्फत सांगलीला दर बुधवारी संध्याकाळी एखाद्याचे प्रवचन हाेते. हा उपक्रम अद्याप चालू आहे.माझे भाग्य असे की, उद्घाटनाचे पहिले प्रवचन देण्याचा मान मला देण्यात आला व तेव्हापासून या प्रांतातील माझी प्रगती वाढत गेली.उपनिषदांवर जागतिक कीर्तीचा ग्रंथ लिहिल्यानंतर रामभाऊंनी 1933 साली Mysticism in Maharashtra प्रसिद्ध केला. हा ग्रंथ वाचून तुला कळून येईल की, ज्ञानेश्वरादी संतांचे तत्त्वज्ञान इंग्लिश भाषेत सांगणारे रामभाऊ आधुनिक ज्ञानेश्वर आहेत.
 
रामभाऊंचा पुढचा Pathway to God in Hindi Literature हा 1954 साली प्रसिद्ध झाला. या ग्रंथात परमार्थाची प्रेरक कारणे, विशुद्ध नैतिक जीवनाची आवश्यकता, देव-भ्नत संबंध, साधनमार्ग व साक्षात्कार याबद्दल अत्युत्तम माहिती दिली आहे. हा ग्रंथ वाचून तुला कळून येईल की, भ्नती हा सर्व सद्गुणांचा मुकुटमणी आहे. हा महत्त्वाचा ग्रंथ रामभाऊंनी स्वत:च्या पारमार्थिक अनुभवाच्या पायावर लिहिला असल्यामुळे या ग्रंथाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ वाचून तुला समजून येईल की, परमार्थात नामस्मरणाला पराकाष्ठेचे महत्त्व आहे.गीतेने ज्ञान, कर्म व भ्नती यांचा समन्वय करताना भ्नतीवर फार जाेर दिला. या ग्रंथातदेखील भ्नतीवर फार जाेर देण्यात आला आहे.