झाले वाऱ्या हातीं माप । समर्थ ताे माझा बाप ।। 1 ।।

    11-May-2023
Total Views |
 
 
saint
 
वाईटाचा प्रचार फार लवकर व वेगाने हाेताे आणि चांगल्याचा प्रसार हा अत्यंत हळू हाेताे असे आपण म्हणताे; पण प्रत्यक्षात असे हाेत नाही. खराेखरच खूप चांगले असेल तर त्याच्या प्रचाराला वेळ लागत नाही. त्यामुळे वाईटाचा प्रचार वेगात हाेताे असे वाटते.इतरांचा चांगुलपणा तसेच चांगल्या गाेष्टींची चर्चा करण्यात अनेकांना अकारण कमीपणा वाटताे. इतरांना चांगले म्हटल्याने आपण लहान हाेताे की काय, अशी लाेकांना अकारण भीती वाटते. अर्थात लाेकांच्या अशा नकारात्मक व स्वार्थी वृत्तीमुळे आपणाला चांगुलपणाचा, चांगल्यांचा प्रसार कमी हाेताे, असे वाटते;
 
पण प्रत्यक्षात असे हाेत नाही. चांगुलपणाचा, चांगल्यांचा प्रसार केवळ वेगाने हाेताे,एवढेच नव्हे तर ताे दीर्घकाळ टिकताेसुद्धा. समचरणी उभा राहून समतेचा, बंधुत्वाचा, निःस्वार्थ प्रेम, कर्तव्याचा संदेश देणाऱ्या आणि सदैव निर्माेही, निःस्वार्थी, सेवेकरी, कर्तव्यतत्पर असणाऱ्या पांडुरंगाच्या भक्तांचा प्रसार वाऱ्यापेक्षाही वेगाने हाेताे. या अनुषंगाने बाेलतांना तुकाराम महाराज म्हणतात, झाले वाऱ्या हातीं माप । समर्थ ताे माझा बाप ।। जय जय राम कृष्ण हरी। - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448